---Advertisement---

ऑस्ट्रेलियाच्या या गोलंदाजाने शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरवर उधळली स्तुतीसुमने; म्हणाला….

On: सोमवार, जानेवारी 18, 2021 4:32 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज वॉशिंग्टन सुंदर व शार्दुल ठाकूरने अविश्वसनीय फलंदाजी केली. दोघांनी सातव्या विकेटसाठी 123 धावांची शानदार भागीदारी केली. याचवेळी जॉश हजलेवुडने देखील 5 बळी मिळवले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना हजलेवुडने शार्दुल व सुंदरची स्तुती केली, तसेच ऑस्ट्रेलियाने काही संधी गमावल्या असल्याचेही स्पष्ट केले.

हेजलवुड म्हणाला, “शार्दुल व सुंदरने उत्तम फलंदाजी केली, मात्र त्यानंतर आम्ही त्यांच्या विकेट घेतल्या. मला जाणवले होते की जेव्हा 200 धावांवर 6 फलंदाज बाद झाले होते, तेव्हा आम्ही सामन्यात पूर्णपणे पुढे आहोत. पण खरे सांगायचे तर दोघांनीही शानदार फलंदाजी केली.”

हेजलवुड पुढे म्हणाला, “माझ्या मते आम्ही आमच्या योजना योग्यपणे अमलात आणू शकलो नाही. आम्हाला काही संधी मिळाल्या पण आम्ही त्यांचा फायदा उचलू शकलो नाही. मला आशा आहे की आम्हाला भविष्यात जर अशा प्रकारे संधी मिळाल्या तर आम्ही त्यांचा पुरेपुर फायदा घेऊ. मात्र शार्दुल व सुंदर दोघांनीही उत्तम फलंदाजी केली. दोघांच्या खेळीने जाणवते की खेळपट्टी अजूनही फलंदाजी करण्यासाठी उत्तम आहे.”

संघाच्या एकूनच गोलंदाजीबद्दल हेजलवुड म्हणाला, “माझ्यामते सर्वच गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी केली. पण आम्ही काही संधी सोडल्या नसत्या तर चित्र काही वेगळेच असते.”

महत्त्वाच्या बातम्या –

यावर्षी आशिया कप स्पर्धा भारताविनाच? ‘या’ कारणामुळे माजी विजेत्यांच्या सहभागाबाबत अनिश्चितता

दोन वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन करताना पहिल्याच चेंडूवर विकेट घेतल्यानंतर शार्दुलने ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

टी-20 विश्वचषकापूर्वी ‘हा’ संघ करणार भारताचा दौरा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---