---Advertisement---

यावर्षी आशिया कप स्पर्धा भारताविनाच? ‘या’ कारणामुळे माजी विजेत्यांच्या सहभागाबाबत अनिश्चितता

On: सोमवार, जानेवारी 18, 2021 4:25 PM
---Advertisement---

यावर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या आशिया कप स्पर्धेला मोठा झटका बसला आहे. या स्पर्धेचा अविभाज्य घटक असणारा बलाढ्य भारतीय संघ यावर्षी मात्र या स्पर्धेत भाग घेणार नसल्याचे वृत्त आता समोर येत आहे. माध्यमांमधील वृत्तानुसार यावर्षी बीसीसीआय मायदेशात स्पर्धा आयोजित करण्याचा विचार करत आहे.

दरम्यान आशिया कप स्पर्धेबद्दल बोलायचे झाल्यास या स्पर्धेचे आयोजन २०२० सालीच केले जाणार होते. परंतु कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी त्याचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे.

यातील भारताच्या सहभागाबाबत माहिती देताना बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की जर आशिया कप स्पर्धेचे ठरलेल्या वेलाप्तर्कानुसार आयोजन झाले तरी ती स्पर्धा आणि आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना एकाच वेळी असेल. जर भारतीय संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला नाही तर आशिया कप स्पर्धेत भाग घेतला जाईल. मात्र असे होण्याची शक्यता आता कमी आहे.”

भारतीय संघाने आशिया कप स्पर्धेत भाग घेतला नाही तर आशिया क्रिकेट कौन्सिलचे मोठे नुकसान होऊ शकते. कारण आत्ताच्या घडीला भारताचा संघ भारतीय उपखंडात सर्वाधिक प्रसिद्ध आणि बलाढ्य असा संघ आहे. त्यामुळे भारताच्या अनुपस्थितीने प्रेक्षकांच्या संख्येवर परिणाम होऊ शकतो. तसेच प्रक्षेपणकर्त्या वाहिन्या देखील या स्पर्धेसाठी फारसा उत्साह दाखवणार नाहीत. अशा परिस्थितीत पुढे काय घडामोडी घडतात, याकडे आशिया क्रिकेट कौन्सिलचे लक्ष असेल.

महत्वाच्या बातम्या:

टी-20 विश्वचषकापूर्वी हा संघ करणार भारताचा दौरा

SL vs ENG : रुटचे द्विशतक आणि गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडचा पहिल्या कसोटीत दमदार विजय

ब्रिस्बेन कसोटीत अंपायरचा शार्दुलवर अन्याय? तळातील फलंदाजाला वेगवान बाउंसर टाकल्याने दिली चेतावणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---