इंडियन प्रीमियर लीग 2023 शेवटच्या टप्प्यात आहे. ही लीग भारतासह जगभरातीच चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र, आयपीएसोबतच आता जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्याचीही चर्चा सुरू आहे. 7 ते 11 जूनदरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला चांगली बातमी मिळाली आहे. आयपीएलमधून दुखापतीचे कारण देत माघार घेणारा जोस हेजलवूड डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी फिट आहे, अशी माहिती समोर येत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामना इंग्लंडमद्ये द ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाला आपला कट्टर प्रतिस्पर्धी संघ इंग्लंडविरुद्ध ऍशेस मालिकाही खेळायची आहे. यावर्षी ऍशेस इंग्लंडमध्ये आयोजित केली गेली असून यामध्येही जोस हेजलवूड (Josh Hazlewood) आपली भेदक गोलंदाजी सादर करू शकतो. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या 32 वर्षीय वेगवान गोलंदाजाला फिट घोषित केले आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, “जोस हेजलवूड आपला शेवटचा आयपीएल सामना खेळल्यानंतर त्याला वेदना जाणवल्या होत्या. मागच्या आठवड्यात तो मायदेशी परतला. थोड्या विश्रांतीनंतर मागच्याच आठवड्यात त्याने सरावाला सुरुवात केली आहे. डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना आणि ऍशस मालिकेच्या पार्श्वभूमीवर त्याचा कार्यभार वाढवला जात आहे. त्याला डब्ल्यूटीसी आणि ऍशेससाठी फिट मानले जावे.” माध्यमांतील वृत्तांनुसार वेगवान गोलंदाजाची पाहणी केल्यानंतर त्याची दुखापत गंभीर नसल्याचे समोर आले आहे.
दुखापतीमुळे हेजलवूड आयपीएल 2023च्या पूर्वार्धातही खेळू शकला नव्हता. यावर्षी आरसीबीने हेजलवूडसाठी 7.75 कोटी रुपये खर्च करून त्याला संघात रिटेन केले होते. मात्र, हंगामातील फक्त तीन सामन्यांमध्ये तो संघासाठी खेळू शकल आणि तीन विकेट्स घेतल्या. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आरसीबीला रविवारी (21 मे) गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे होते. या महत्वाच्या सामन्याआधी हेजलवूडने दुखापतीचे कारण देत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. परिणामी आरसीबीचे गोलंदाजी आक्रमण या सामन्यात कमजोर दिसले आणि त्यांना 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. (Josh Hazlewood declared fit for the WTC Final.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठ्या मनाचा कोहली! जबरदस्त शतकानंतर गिलला मारली मिठी, दु:ख विसरून मनापासून केलं कौतुक
संतापजनक! आरसीबीच्या पराभवानंतर चाहत्यांनी सोडली पातळी, मॅचविनर गिल अन् त्याच्या बहिणीला केली शिवीगाळ