---Advertisement---

दुसऱ्या ऍशेस सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, संघातील दिग्गज गोलंदाज झाला बाहेर

On: सोमवार, डिसेंबर 13, 2021 5:43 PM
australia ashes
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ऍशेस मालिकेला प्रारंभ झाला आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर पार पडला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत ९ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलिया संघाने कसोटी मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. आता येत्या १६ डिसेंबर पासून ऍशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे.

ऑस्ट्रेलिया संघातील वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड साईड स्ट्रेनच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला आहे. पहिला कसोटी सामना सुरू असताना देखील तो दुखापतग्रस्त असल्याचे आढळून आले होते. या सामन्यातील दुसऱ्या डावात त्याने १४ षटक गोलंदाजी केली होती.

माध्यमातील वृत्तानुसार, जोश हेजलवूड संघातील कुठल्याही सहकाऱ्याशिवाय सिडनीला जाताना दिसून आला आहे. गेल्या आठवड्यात इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध सराव सामना खेळणारा ऑस्ट्रेलिया ए संघाचा झाय रिचर्डसन आणि मायकल नासीर हे राखीव खेळाडू म्हणून उपलब्ध आहेत. पण आता २०१९ नंतर पहिल्यांदाच झाय रिचर्डसनला खेळण्याची संधी मिळणार आहे.

क्रिकेट डॉट कॉम एयु द्वारे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, ” जोश हेजलवूडला वेदना होत होत्या. ही एक चांगली बाब होती की, त्याने बाहेर येऊन गोलंदाजी केली. खरचं त्याने खूप चांगली गोलंदाजी केली. परंतु, तो अडचणीत असल्यामुळे आम्ही त्याला जास्त त्रास देऊ शकत नाही. आम्ही त्याच्या दुखापतीवर लक्ष देऊन आहोत. त्याला पाठीच्या दुखण्याच्या त्रास आहे.”

ऍशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना १६ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान, ॲडीलेड ओव्हलमध्ये पार पडणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

खासदारांनी थोपटली युवा कौशलची पाठ; नुकतीच झालीये टीम इंडियात निवड

बापरे! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालाय तरी धोनी कमावतो कोट्यावधी रुपये; मालमत्ता जाणून बसेल धक्का

दक्षिण आफ्रिकेत कर्णधार म्हणून मैदानात उतरण्यापूर्वीच रोहितला ४४० व्होल्टचा धक्का, सरावदरम्यान झाली दुखापत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---