क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीजच्या आजच्या सातव्या दिवशी ‘अ’ गटातील शेवटच्या लढती झाल्या. ‘अ’ गटातून अहमदनगर पेरियार पँथर्स, मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स, पुणे पलानी टस्कर्स व कोल्हापूर ताडोबा टायगर्स हे संघानी टॉप 4 मध्ये आपला स्थान निश्चित केला.
आज झालेल्या पहिल्या लढतीत पुणे पलानी टस्कर्स संघाने 62-20 असा लातूर संघाचा पराभव करत टॉप 4 मध्ये स्थान पक्का केला. पुणे कडून भूषण तपकीर व रोहित होडशील ने सुपर टेन पूर्ण केला. तर योगेश अक्षुमनी व ऋषिकेश पाटीलने 7-7 पकडी करत सामना एकतर्फी केला. आजच्या दिवसाचा दुसरा सामना टॉप 2 संघाच्या मध्ये झाला. मुंबई उनगरच मुर्थाल मॅग्नेट्स व अहमदनगर पेरियार पँथर्स दोन्ही संघांनी एकमेकांना काटे की टक्कर देत सामना रंगवला. अखेर 37-37 असा सामना बरोबरीत राहिला.
आजच्या दिवसाचा निर्णायक सामना झाला तो कोल्हापूर ताडोबा टायगर्स विरुद्ध रायगड मराठा मार्वेल्स यांच्यात झाला. दोन्ही संघ गुणतालिकेत 18 गुणांवर असल्याने जो जिंकणार तो टॉप 4 मध्ये जाणार होता. रायगड मराठा मार्वेल्स संघाने आजच्या बचावफळीने जबरदस्त खेळाचा प्रदर्शन केला. पण शेवटच्या काही मिनिटात कोल्हापूरच्या तेजस पाटील ने सामना फिरवला. अखेर सामना 33-33 असा बरोबरीत सुटला. दोन्ही साखळीचे साखळी गुण सारखे 21-21 झाले मात्र कोल्हापूर संघाने कमावलेले व गमावलेल्या गुणांच्या फरकावर टॉप 4 मध्ये आपला स्थान निश्चित केला. आजच्या शेवटच्या सामन्यात पालघर काझीरंगा रहिनोस संघाने सांगली संघावर 73-19 अशी मात दिली.
अ गटातील टॉप 4 संघ थेट प्रमोशन व प्ले-ऑफस साठी पात्र ठरले असून बॉटम 4 संघाना रेलिगेशन फेरी खेळावी लागणार आहे. उद्या 6 एप्रिल 2023 पासून ‘ब’ गटातील लढतीना सुरुवात होईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पालघर काझीरंगा रहिनोस संघाची सांगली सिंध सोनिक्स संघावर मात
‘ब’ गटात परभणी पांचाला प्राईड संघाची विजयी सलामी