पुणे (8 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये अ गटातील संघाच्या आज प्रत्येकी चार लढती पूर्ण झाल्या. आजच्या दिवसाच्या खेळानंतर अहमदनगर संघाने गुणतालिकेत पहिला स्थान कायम ठेवला. बीड जिल्हाने मुंबई शहर संघाचा 10 गुणांनी पराभव करत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. तर रत्नागिरी संघाने आजचा सामना बरोबरीत ठेवत तिसरा स्थान मिळवला. नांदेड व मुंबई शहर 12 गुणांसह अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत.
आजच्या दिवसाची सुरुवात नांदेड विरुद्ध धुळे या लढतीने झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत धुळे संघाने अंतिम चढाईत 6 गुण मिळवत नांदेड संघाचा विजय हिसकावून घेतला. 3 गुणांची पिछाडी असताना वैभव बोरसे ने कमाल करत आपल्या संघाला महत्वपूर्ण विजय मिळवून दिला. तर दुसऱ्या सामन्यात रायगड संघाने जालना संघाला 52 गुणांच्या फरकाने धूळ चारली. निखिल शिर्के व प्रशांत जाधवच्या आक्रमका पुढे जालना संघाचा टिकाव लागला नाही.
आजची तिसरी लढतीत टॉप दोन संघात झाली. अहमदनगर संघाने संपूर्ण सामन्यात पूर्ण वेळ आघाडी वर फक्त एकदा 1 गुणाने पिछाडीवर होता. मात्र अंतिम क्षणी सामना बरोबरीत राहिल्याने त्याना गुणतालिकेत आज फक्त 3 गुणांवर समाधान मानावा लागला. रत्नागिरी संघाने मात्र अहमदनगर संघाचा विजयी रथ रोखला. मुंबई शहर विरुद्ध बीड यांच्यात झालेल्या
सामन्यात बीड संघाने 10 गुणांनी मुंबई शहर वर मात देत तिसरा विजय मिळवला. संदेश देशमुखच्या उत्कृष्ट पकडीनी बीड जिल्हाचा विजय सोपा झाला.
संक्षिप्त निकाल-
नांदेड जिल्हा 26 – धुळे जिल्हा 29
जालना जिल्हा 18 – रायगड जिल्हा 70
अहमदनगर जिल्हा 28 – रत्नागिरी जिल्हा 28
बीड जिल्हा 37 – मुंबई शहर 27
महत्वाच्या बातम्या –
रायगड संघाने के.एम.पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये विजयाचा खात उघडला
विजयाच्या हट्रिक संघ अहमदनगर संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकवर