पुणे (7 March 2024) – सलग दोन विजयासह आज तिसऱ्या दिवशी अहमदनगर व बीड संघ मैदान उतरले होते. दोन्ही संघ तिसरा विजय मिळवण्यासाठी उत्सुक होते. अहमदनगर संघाकडून प्रफुल झवारे, प्रसाद गोरे यांनी चढाईत तर आशिष यादव यांनी पकडीत गुण मिळवत संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. सामन्याच्या आठव्या मिनिटाला बीड संघाला ऑल आऊट करत 10-02 अशी आघाडी मिळवली.
बीडच्या राहुल टेकेचे प्रदर्शन निराशाजनक होते. अहमदनगरच्या प्रफुल झवारे ने चढाईत गुण मिळवत तर प्रसाद गोरे ने पकडीत गुण मिळवत संघाला मध्यंतरा पर्यत 17-08 अशी आघाडी मिळवली होती. मध्यंतरा नंतरही अहमदनगर संघाने आघाडी कायम ठेवत तिसऱ्या विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू होती. प्रसाद गोरे, सौरव मेद व संभाजी वाबले या खेळाडूंनी अहमदनगर संघाची बचवाफळीत उत्कृष्ट प्रदर्शन करत महत्वपूर्ण भूमिका निभावली.
अहमदनगर संघाने 44-20 असा बीड संघाचा पराभव करत सलग तिसरा विजय मिळवला. अहमदनगर कडून प्रफुल झवारे ने दुसरा सुपर टेन पूर्ण केला. तर प्रसाद गोरे ने हाय फाय केला. तर सौरव मेद व संभाजी वाबले यांनी पकडीत प्रत्येकी 4-4 गुण मिळवले. अहमदनगर संघाकडून 7 ही खेळाडूंकडून गुण मिळवत सांघिक प्रदर्शन केले. तर बीड कडून संदेश देशमुख, तेजस झगडे यांनी प्रत्येकी 5-5 गुण मिळवले. (K. M. P. Hat-trick for Ahmednagar team in Yuva Kabaddi Series)
बेस्ट रेडर- प्रफुल झवारे, अहमदनगर
बेस्ट डिफेंडर- प्रसाद गोरे, अहमदनगर
कबड्डी का कमाल- संभाजी वाबले, अहमदनगर
महत्वाच्या बातम्या –
के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये अहमदनगर, बीड संघाचा सलग दुसरा विजय
प्रीतीला पाहताक्षणी 13 वर्षाचा अश्विन प्रेमात पडला होता! जाणून घ्या क्रिकेटच्या ‘अण्णा’ची फिल्मी लव्ह स्टोरी