---Advertisement---

…म्हणून सॅमसन, इशान किशन नाही तर या खेळाडूचा झाला पंत ऐवजी टीम इंडियात समावेश

On: शुक्रवार, जानेवारी 17, 2020 2:14 PM
---Advertisement---

राजकोट। आज(17 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसरा वनडे सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट येथे सुरु आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने केएस भरतला राखीव यष्टीरक्षक म्हणून संघात सामील केले आहे.

भारताचा नियमित यष्टीरक्षक रिषभ पंतला मंगळवारी(14 जानेवारी) पार पडलेल्या पहिल्या वनडे सामन्यादरम्यान फलंदाजी करताना पॅट कमिन्सने टाकलेला चेंडू हेल्मेटला लागल्याने दुखापत झाली होती.

त्यामुळे तो आजच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्याऐवजी केएल राहुल आज यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळत आहे. त्याला राखीव यष्टीरक्षक म्हणून भरतला संघात स्थान देण्यात आले आहे.

सध्या संजू सॅमसन आणि इशान किशन हे दोघेही यष्टीरक्षक फलंदाज भारत अ संघासह न्यूझीलंड दौऱ्यावर असल्याने निवड समीतीने राखीव यष्टीरक्षक म्हणून भरतला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

पंत सध्या बंगळूरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅबिलिटेशनसाठी गेला आहे. त्याची 19 जानेवारीला ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या वनडेसाठीची उपलब्धता तो रिहॅबिलिटेशनमध्ये कसा प्रतिसाद देतो त्यावर अवलंबून असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---