---Advertisement---

‘हा तर सुर्यकुमार यादवला संपवण्याचा डाव?’, भारताच्या माजी दिग्गजाचे कर्णधार रोहितवर प्रश्नचिन्ह

On: मंगळवार, ऑगस्ट 2, 2022 2:15 PM
suryakumar-rohit
---Advertisement---

भारत २०२२चा टी-२० विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून नुकत्याच झालेल्या सामन्यांमध्ये वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहे. असाच प्रयोग वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या दोन टी-२० सामन्यांमध्ये (WI vs IND) पाहायला मिळाला. मात्र, सूर्यकुमार यादवच्या सलामीवर अनेक तज्ज्ञांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत, आता या यादीत कृष्णमाचारी श्रीकांतचेही नाव जोडले गेले आहे. श्रीकांतने भारतीय कर्णधार रोहित शर्मावर राग काढला आहे.

या दोन सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादव हा रोहित शर्माचा सलामीचा जोडीदार म्हणून दिसला, जो सहसा मधल्या फळीत दिसतो. मात्र, संघ व्यवस्थापनाचा हा वापर पहिल्या दोन सामन्यांनंतर फोल ठरल्याचे दिसून येत आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये सूर्यकुमारला सलामीवीर म्हणून मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने २४ धावा केल्या होत्या. त्याचवेळी काल झालेल्या सामन्यात त्याच्या बॅटमधून फक्त ११ धावा निघाल्या.

सोमवारी सेंट किट्स येथे दुसऱ्या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी फॅन कोडशी बोलताना श्रीकांतने रोहितला या मालिकेत सलामीचा फलंदाज म्हणून सूर्यकुमारचा वापर करण्याच्या रणनीतीबद्दल कडक ताकीद दिली. तो म्हणाला की, “विश्वचषकापूर्वी सूर्यकुमार अलीकडील अपयशांमुळे आपला आत्मविश्वास गमावू शकतो, जो भारताला अजिबात आवडणार नाही.”

सूर्यकुमार यादव सारख्या खेळाडूला खराब करू नका – श्रीकांत
सूर्यकुमार यादव हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. टी-२० विश्वचषकात त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी. मग तो सलामीला का येत आहे? तुम्हाला कोणी सलामीवीर हवा असेल तर श्रेयस अय्यरला बाहेर काढून आणि इशान किशनला निवडा. मी सांगण्याचा प्रयत्न करतोय ते सोपे आहे. सूर्यकुमार यादवसारख्या क्रिकेटपटूला खराब करू नका. कृपया असे करू नका. दोन-तीन अपयशानंतर त्याचा आत्मविश्वास कमी होईल. क्रिकेट हा आत्मविश्वासाचा खेळ आहे.

दरम्यान, याआधी भारतीय संघव्यवस्थापनाने रिषभ पंतला सलामीवीर म्हणून सामन्याची सुरुवात करण्याची संधी दिली होती. त्यानंतर आता सुर्यकुमार यादव सलामीला येत आहे. काही दिवसांत केएल राहुल संघात पुनरागमन करू शकतो त्यावेळी सुर्यकुमार यादव सारख्या प्रतिभावान खेळआडूला संघाबाहेर जाण्याची वेळ येऊ शकते. या सर्व गोष्टींचा विचार केल्यास भारतीय संघ सध्या चुकीचे निर्णय घेत असलल्याचा आरोपही अनेक क्रिकेट जाणकारांकडून केला जात आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

एकाच सामन्यात पाहायला मिळाले तीन अर्शदीप सिंग, एक ओरिजनल तर दोघांची ‘पगडी’ गायब

पराभवानंतर वाढले भारतीय संघाचे टेंशन, फॉर्मात असलेला ‘हा’ गोलंदाज तिसऱ्या टी२०तून बाहेर

ओबेड मॅकॉयने लगावला विकेट्सचा ‘षटकार’, बनलाय भारताविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---