दुबईमध्ये सुरु असलेली कबड्डी मास्टर्स स्पर्धा हळूहळू रंगत चालली आहे. भारत आणि इराणने त्यांचे पहिले दोन्ही सामने जिंकून स्पर्धेला चांगली सुरवात केली आहे.
भारताने साखळी फेरीच्या पहिल्या टप्प्यात पाकिस्तान आणि केनियाला पराभूत केले आहे. आज पुन्हा एकदा भारताचा सामना साखळी फेरीत पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. या सामन्याला रात्री 9 वाजता सुरुवात होईल.
पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध 36-20 अशा फरकाने सहज विजय मिळवला होता. पण आता पाकिस्तानच्या संघात त्यांचे दोन स्टार रेडर सज्जाद शौकत आणि मुजम्मल हुसेन यांचा समावेश झाला आहे. त्यामुळे भारतासमोर त्यांचे आव्हान असणार आहे.
तसेच 23 जूनला केनियाविरुद्ध सुपरटेन पुर्ण केलेले रेडर रिशांक देवाडिगा आणि मोनू गोयात यांना भारताच्या संघात कायम ठेवण्याची शक्यता आहे. तसेच मनजित चिल्लर या अनुभवी खेळाडूलाही आजच्या महत्त्वाच्या सामन्यासाठी संघात कायम केले जाऊ शकते.
याबरोबरच गिरीश एर्नाक, सुरेंदर नाडा हे डिफेंडर्सला आणि या स्पर्धेत आत्तापर्यंत अष्टपैलू खेळाडू म्हणून उत्तम कामगिरी करणारा संदिप नरवालही संघात त्यांचे स्थान कायम ठेवण्याची शक्यता आहे.
त्याबरोबरच पाकिस्तान संघात सज्जाद शौकत आणि मुजम्मल हुसेन यांचे स्थान तर जवळ जवळ पक्केच आहे. त्यांच्याबरोबर इब्रार हुसेन हा रेडरही संघात कायम राहू शकतो.
तसेच डीफेंडर आसणाऱ्या वासिम सज्जादला आणि अष्टपैलू मुहम्मद नदीम यांनाही संघात कायम केले जाऊ शकते. याबरोबरच अष्टपैलू मुहम्मद इम्रानलाही आज संधी मिळण्याची शक्यता आहे.
भारतीय संघ या स्पर्धेत स्टार रेडर अजय ठाकूरच्या नेतृत्वाखाली तर पाकिस्तानचा संघ अष्टपैलू नासीर हुसेनच्या नेतृत्वाखाली खेळत आहे.
असे असतील संभाव्य संघ:
भारत: अजय ठाकूर (कर्णधार), रिशांक देवाडिगा, मोनू गोयात, मनजित चिल्लर, गिरीश एर्नाक, सुरेंदर नाडा, संदिप नरवाल.
पाकिस्तान: नासीर हुसेन (कर्णधार), सज्जाद शौकत, मुजम्मल हुसेन, वासिम सज्जाद, मुहम्मद नदीम, मुहम्मद इम्रान,इब्रार हुसेन.
महत्तवाच्या बातम्या:
–चौथ्या कबड्डी विश्वचषकाचे यजमानपद भारताला नाही तर या देशाला मिळणार!
–महाराष्ट्राचा कर्णधार रिशांक देवाडीगाने दुबई मास्टर्स स्पर्धेत केले समालोचन
–कबड्डी मास्टर्स स्पर्धेत भारताचा सलग दुसरा विजय, दुबईत रिशांक देवडिगा चमकला