सोमवारी (५ ऑक्टोबर) इंडियन प्रीमियर लीग २०२०चा १९ वा सामना पार पडला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला ५९ धावांनी पराभूत केले. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १९६ धावा केल्या. प्रत्युत्तरात बेंगलोर संघ २० षटकात ९ विकेट्स गमावत १३७ धावाच करु शकला. परिणामत: दिल्लीने हंगामातील चौथा सामना खिशात घातला. दरम्यान दिल्लीच्या कागिसो रबाडा आणि रिषभ पंत या जोडीने एक अनोखा विक्रम केला आहे.
दिल्लीच्या १९७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरचे देवदत्त पड्डीकल आणि ऍरॉन फिंच सलामीला फलंदाजीसाठी मैदानावर उतरले होते. पण युवा फलंदाज पड्डीकल दिल्लीच्या गोलंदाजांपुढे जास्त वेळ टिकू शकला नाही आणि तो २.६ षटकात केवळ ४ धावा करत पव्हेलियनला परतला. त्यानंतर बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला.
विराट बचावात्मक खेळी करत संघाचा डाव पुढे नेत होता. पण डावातील १४व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रबाडाने त्याला पंतच्या हातून झेलबाद केले. त्यामुळे विराट ३९ चेंडूत ४३ धावा करत मैदानाबाहेर गेला. विराटची विकेट ही या गोलंदाज आणि यष्टीरक्षक जोडीने मिळून घेतलेली आयपीएलमधील १५वी विकेट होती. यासह रबाडा-पंतची जोडी ही आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिकवेळा फलंदाजांना झेलबाद करणारी गोलंदाज-यष्टीरक्षक जोडी ठरली आहे.
पंतच्या या हंगामातील कामगिरीविषयी बोलायचं झालं तर, त्याने आतापर्यंत ५ सामन्यात ७ फलंदाजांना यष्टीमागे बाद केले आहे. यासह तो आयपीएलच्या तेराव्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत एमएस धोनीसह संयुक्तपणे अव्वल स्थानावर विराजमान आहे.
तसेच बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात २४ धावा देत ४ विकेट्स घेत रबाडाने या हंगामातील आतापर्यंंतची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी नोंदवली आहे. तसेच या हंगामात आतापर्यंत एका सामन्यात ४ विकेट्स घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल 2020 : भुवनेश्नर कुमारच्या जागी हैदराबादने ‘या’ भारतीय गोलंदाजाला दिली संधी
दुबईहून भारतीय संघ थेट ऑस्ट्रेलियाला होणार रवाना? पाहा काय आहे कारण
‘त्या’ खेळाडूला दिलेल्या जीवदानामुळेच आम्ही सामना गमावला – विराट कोहली
ट्रेंडिंग लेख-
असे ५ खेळाडू ज्यांनी आयपीएलमध्ये सलामीला आणि ८ व्या क्रमांकावर केली आहे फलंदाजी
दुर्दैवी…! आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद झालेले ३ फलंदाज; विराटचाही आहे समावेश