---Advertisement---

भारताच्या दौऱ्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का; हा प्रमुख खेळाडू झाला संघाबाहेर

On: रविवार, मार्च 1, 2020 4:00 PM
---Advertisement---

कालपासून (29 फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात (South Africa Vs Australia) 3 सामन्यांची वनडे मालिका (ODI Series) सुरु झाली आहे. या मालिकेनंतर यजमान दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. तेथे दोन्ही संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल.

मात्र, या दोन्ही मालिकेपुर्वी दक्षिण आफ्रिका संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (Kagiso Rabada) दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे.

दुखापतीमुळे रबाडाला ऑस्ट्रेलिया आणि भारत संघाविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळता येणार नाही. त्याच्या मांडीच्या स्नायूला ताण आल्यामुळे त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली होती.

या दुखापतीमुळे रबाडाला 4 आठवडे क्रिकेट खेळता येणार नाही. परंतु, आयपीलच्या येत्या हंगामापुर्वी तो तंदुरुस्त होईल, त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाला काळजी करण्याची गरज नाही.

भारताविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला 12 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यातील दुसरा सामना 15 मार्च रोजी तर, तिसरा आणि शेवटचा सामना 18 मार्च रोजी खेळण्यात येईल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत रबाडाच्या जागी कोणता खेळाडू गोलंदाजी करणार आहे, हे अद्यापही समोर आलेले नाही. तसेच, भारतीय संघाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही दक्षिण आफ्रिकेचा संघ निवडण्यात आलेला नाही.

रबाडाच्या दुखापतीबाबतीत दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शोएब मांजरा यांनी सांगितले की, “रबाडाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेदरम्यान मांडीच्या स्नायूत ताण आला होता. त्याच्या दुखापतीवर मेडिकल टीम उपचार करत आहे. त्याची दुखापत ठीक होण्यासाठी कमीत कमी 4 आठवडे लागतील. त्याला सध्या आरामाची गरज आहे.”

https://twitter.com/Maha_Sports/status/1234054795218083840

https://twitter.com/Maha_Sports/status/1234023513117384704

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---