भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने नेहमीच रोमांचक असतात आणि ते चाहत्यांच्या लक्षातही राहतात. या सामन्यांदरम्यान झालेले वादसुद्धा आपण कायम लक्षात ठेवतो. पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक कामरान अकमल आणि भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यामध्ये आशिया चषकादरम्यान २०१० मध्ये जो वाद झाला होता, तो कायमच चर्चेत राहिला आहे. कामरान अकमलने (kamran akmal) या वादाची पुन्हा एकदा आठवन करुन दिली असून तो केवळ गैरसमज असल्याचं म्हटलं आहे.
लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये सहभागी झालेल्या कामरान अकमलला अनेक प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यावेळी त्याने गौतम गंभिरसोबतच्या वादावर ही मत मांडले आहे. अकमलला विचारण्यात आले की त्याचा सर्वात मोठा शत्रू कोण? गौतम गंभीर की हरभजन सिंग. त्यावर यापैकी कोणीच शत्रू नसल्याचे त्याने म्हटल आहे.
कामरान अकमल म्हणाला, ‘माझी कोणाशीच दुश्मनी नाही, काही गैरसमज झाले होते. आशिया चषकात काही गैरसमज झाले होते, आम्ही दोघेही चांगले मित्र आहोत. आम्ही अ संघासोबत खेळलो आहे, त्यामुळे असे काहीही नाही.’
अधिक वाचा – टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेचे वेळापत्रक घोषित; भारत-पाकिस्तान सामना रंगणार ‘या’ दिवशी
साल २०१० मध्ये आशिया चषकासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगला होता. दरम्यान, गौतम गंभीर आणि कामरान अकमल यांच्यात जोरदार वाद झाला होता. तेव्हा संघातील खेळाडू आणि पंच बचावासाठी आले होते. तेव्हा सईद अजमलचा चेंडू गौतम गंभीरच्या बॅटजवळून गेला आणि अकमलने त्याला आवहन केले. त्यामुळे गौतम गंभीर संतापला आणि दोघांमध्ये वाद झाले. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मासोबत कामरान अकमलची अशीच वादावादी झाली होती.
व्हिडिओ पाहा – द्रविडने लॉर्ड्सवर प्रसाद बरोबर लावलेली पैज १५ वर्षांनी केली पूर्ण
कामरान अकमल अलीकडेच लेजेंड्स लीग क्रिकेट २०२२ मध्ये दिसला. तो आशिया लायन्स संघाचा भाग होता. ४० वर्षीय अकमल आता पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याने पाकिस्तानसाठी ५३ कसोटी सामने खेळले असून ३०च्या सरासरीने अडीच हजारांहुन अधिक धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –