इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने येत्या १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये पार पडणार आहेत. या स्पर्धेसाठी सर्वच संघ कसून सराव करत आहेत. क्रिकेट चाहत्यांचे या सामन्यात भरपूर मनोरंजन होणार यात काही शंकाच नाही. परंतु आयपीएल २०२१ स्पर्धेचा पहिला टप्पा गाजवणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात अप्रतिम कामगिरी केली होती. या संघाला आयपीएल स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. तसेच दुसऱ्या टप्प्यातही हा संघ चांगली कामगिरी करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. पण त्याआधीच आरसीबी संघासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. अहवालानुसार, ऑस्ट्रेलियन संघाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्यांसाठी यूएईला जाणार नाही.
ऑस्ट्रेलियन संघाचा वेगवान गोलंदाज आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात १ सामना खेळला होता. ज्यामध्ये त्याला ३ षटक गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. या दरम्यान त्याने २९ धावा देत १ गडी बाद केला होता. केन रिचर्डसनच नव्हे तर, ॲडम झम्पा देखील आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उपस्थित नसेल. ॲडम झम्पाने कोरोनाची भीती पाहता आयपीएल स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील खेळाडू ऑगस्ट महिन्याच्या शेवटी युएईला रवाना होणार आहे. तसेच बीसीसीआयने २० ऑगस्टपर्यंत आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यास सांगितले आहे.(Kane Richardson Adam zampa could miss to join rcb squad)
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी खेळाडूंना खेळण्याची पोच पावती देण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाचे असे म्हणणे आहे की, आयपीएल स्पर्धेत खेळल्यामुळे खेळाडूंना टी-२० विश्वचषक स्पर्धेत फायदा होईल. कारण टी-२० विश्वचषक स्पर्धा देखील युएईमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेलसारखे फलंदाज या स्पर्धेत खेळताना दिसून येऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
नुकतीच ठोकलीत २ शतके, आता थेट टी२० विश्वचषकातून पदार्पण करणार ‘जोश इंग्लिश’; वाचा त्याच्याबद्दल
कोहलीची ‘विराट’ दूरदृष्टी! २०१५ मध्येच केला होता भारताला सर्वोत्कृष्ट कसोटी संघ बनवण्याचा संकल्प
कोहलीची ‘विराट’ दूरदृष्टी! २०१५ मध्येच केला होता भारताला सर्वोत्कृष्ट कसोटी संघ बनवण्याचा संकल्प