बुधवारी (दि. 22 मार्च) आयसीसीची क्रमवारी जाहीर झाली. आयसीसी कसोटी क्रमवारी यादीत न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विलियम्सन याची चांदी झाली. विलियम्सन फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी विराजमान झाला. तसेच, गोलंदाजांच्या वनडे क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या जोश हेजलवूड याने बाजी मारत अव्वलस्थान गाठले. यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याची मात्र घसरण झाली.
केन विलियम्सन (Kane Williamson) याला फलंदाजांच्या आयसीसी कसोटी क्रमवारी (ICC Test Rankings) यादीमध्ये 4 स्थानांचा फायदा झाला. तसेच, त्याने दुसरे स्थान पटकावले. त्याला हे स्थान मिळण्यामागील कारण म्हणजे, विलियम्सनने श्रीलंकेविरुद्ध वेलिंग्टन येथे 215 धावांची वादळी खेळी साकारली होती. या कसोटीत विलियम्सनने हेन्री निकोल्स (नाबाद 200 धावा) याच्यासोबत त्रिशतकी भागीदारी रचली होती. त्यालाही क्रमवारीत फायदा झाला. त्याने 20 जागांची झेप घेत 27वे स्थान पटकावले. यांच्या जोरावर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत न्यूझीलंडने श्रीलंकेला 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0ने नमवले.
https://twitter.com/ICC/status/1638453505340891136
विलियम्सनचे फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीतील गुण 883 आहेत. तसेच, अव्वलस्थानी ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅब्युशेन (Marnus Labuschagne) असून त्याचे गुण 915 आहेत. याव्यतिरिक्त, गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत कर्णधार टीम साऊदी याने एक जागेचा फायदा 11वे स्थान पटकावले. तसेच, मॅट हेन्री हादेखील 4 जागांचा फायदा घेत 31वे स्थानी विराजमान झाला.
दुसरीकडे, श्रीलंका संघाचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने हा फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत 10व्या स्थानी विराजमान झाला. त्याने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 89 आणि दुसऱ्या डावात 51 धावांची खेळी साकारली होती. त्याच्याव्यतिरिक्त दिनेश चंदीमल याने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 37 आणि दुसऱ्या डावात 62 धावांची खेळी साकारत एका जागेचा फायदा घेत 17वे स्थान पटकावले.
याव्यतिरिक्त गोलंदाजांच्या आणि अष्टपैलूंच्या कसोटी क्रमवारीतील अव्वलस्थान भारतीयांनी काबीज केले आहे. गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत आर अश्विन (R Ashwin) 859 गुणांसोबत अव्वलस्थानी आहे. तसेच, अष्टपैलूंच्या कसोटी क्रमवारीत रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) 431 गुणांसह अव्वलस्थानी आहे. (kane Williamson 2nd in ICC Men’s Test Player Rankings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडे विश्वचषक 2023चं वेळापत्रक आलं रे, ‘या’ दिवशी खेळला जाणार अंतिम सामना?
वनडेत अपयशी ठरत असलेल्या सूर्याच्या खांद्यावर ठेवला कोच द्रविडने हात! म्हणाला, “त्याच्यात गुणवत्ता असून…”






