आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला ९ एप्रिलपासून सुरूवात झालेली आहे. यंदा रमजानच्या काळातच आयपीएलचे आयोजन होते आहे. त्यामुळे रमजान पाळणारे काही खेळाडू रोजे सुरू असतांना देखील खेळत आहेत.
याच दरम्यान सनरायझर्स हैद्राबादच्या खेळाडूंनी एकजुटीचे प्रदर्शन केले आहे. हैद्राबादचा लेगस्पिनर राशिद खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओने अनेक चाहत्यांची मने जिंकली आहेत.
विलियम्सन-वॉर्नरची हृदयस्पर्शी कृती
राशिद खानने शेअर केलेल्या व्हिडिओत हैद्राबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि केन विलियम्सन देखील दिसत आहेत. हैद्राबादच्या संघातील राशिद खान, मुजीब उर रहमान आणि खलील अहमद या खेळाडूंनी रमजानमुळे रोज़े ठेवले आहेत. त्यांना साथ देण्यासाठी वॉर्नर आणि विलियम्सन यांनी देखील रोज़े ठेवल्याचे राशिद खान या व्हिडिओत सांगतो आहे.
तसेच यात रोज़े ठेवल्यावर कसे वाटते आहे, असा प्रश्नही राशिद खान वॉर्नर आणि विलियम्सनला विचारतो. त्यावर कर्णधार वॉर्नर म्हणतो, “रोजा छान वाटतो आहे. मात्र हे खूप कठीण आहे. मला खूप तहान आणि भूक लागली आहे.” त्याचवेळी विलियम्सनने राशिदला उत्तर देतांना छान वाटत असल्याचे सांगितले. राशिदने देखील रोजा ठेवल्याबद्दल वॉर्नर आणि विलियम्सनला धन्यवाद दिले आहेत.
https://www.instagram.com/p/CNz_sbshmP0/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, हैदराबाद साठी यंदाच्या हंगामात खराब सुरुवात झाली आहे. तीन सामने खेळून देखील अद्याप त्यांना विजयाचे खाते उघडण्यात अपयश आले आहे. गोलंदाजीत चांगली कामगिरी करत असले तरी फलंदाजांच्या हाराकिरीमुळे त्यांना सामने गमवावे लागत आहेत. त्यामुळे आगामी सामन्यात या चुका सुधारून कठोर मेहनतीसह पुनरागमन करण्याचे त्यांचे ध्येय असेल.
महत्वाच्या बातम्या:
क्या यही प्यार है? पतीचे यश पाहून धनश्री वर्माचे डोळे पाणावले, पाहा तो भावुक करणारा क्षण
केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लग्नाला बापमाणसाकडून हिरवा कंदील, प्रतिक्रिया वाचून तुमचीही पटेल खात्री!
हे कोलकाताचे दुर्दैव आहे की त्यांच्याकडे असा खेळाडू आहे; इंग्लिश दिग्गजाने व्यक्त केली चिंता