---Advertisement---

विराट कोहलीच्या ‘या’ कल्पनेला केन विलियम्सनने केला विरोध, म्हणाला…

On: शुक्रवार, जून 25, 2021 4:06 AM
---Advertisement---

बहुप्रतीक्षित जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा ८ गड्यांनी पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. न्यूझीलंड संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर अंतिम फेरीत देखील सांघिक खेळ दाखवत विश्वविजेतेपद आपल्या नावे केले. यानंतर संघाचा कर्णधार केन विलियम्सनने आगामी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा विजेता कसा निवडावा याविषयी आपले मत व्यक्त केले.

असा व्हावा विजेतेपदाचा निर्णय
न्यूझीलंडने २०१९ पासून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. अंतिम फेरीत पाऊस तसेच अंधुक प्रकाशामुळे वारंवार खेळात बाधा आल्यानंतरही न्यूझीलंडने संयम राखत भारताला पराभूत करत, या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले.

त्यानंतर बोलताना संघाचा कर्णधार केन विलियम्सनने अशा प्रकारच्या मोठ्या स्पर्धेचा विजेता कशाप्रकारे ठरवावा, हे सांगताना म्हटले, “मला वाटते आगामी स्पर्धेचा विजेता देखील अशा एकाच सामन्यातून ठरविणे उचित ठरेल. एका सामन्यामुळे खेळातील रोमांचकता आणि गतिशीलता कायम राहते. जे काही व्हायचे ते एकाच सामन्यात घडून जाईल. अशा प्रकारच्या स्पर्धेचा विजेता मालिकेतून निवडायचा म्हटल्यास त्यासाठी वेळ लागेल. अशा प्रकारची मोठी स्पर्धा आयोजित करताना सर्वात मोठी समस्या ही स्पर्धेचा कार्यक्रम आखणे असते. हा सामना एक दर्जेदार होता.”

विलियम्सनच्या नेतृत्वातील न्‍यूझीलंडचे हे पहिले आयसीसी विजेतेपद असून, २०१९ वनडे विश्वचषकात त्यांना इंग्लंडकडून अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.

विराटने सुचवली होती ही कल्पना
भारतीय संघाचा कर्णधार कोहलीचा विचार मात्र या गोष्टीवर वेगळा आहे. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने सांगितले होते की, “केवळ एका सामन्याने सर्वश्रेष्ठ संघ कोण हे ठरवता येत नाही. यासाठी ‘बेस्ट ऑफ थ्री’ सारखा पर्याय वापरावा. यामध्ये जो बाजी मारेल तोच खरा सर्वश्रेष्ठ संघ असेल. भविष्यात या गोष्टीवर विचार केला पाहिजे. बेस्ट ऑफ थ्री खेळताना एखादा सामना गमावल्यावर तुम्हाला दुसऱ्या सामन्यात चूक सुधारण्याची संधी मिळते. आम्ही गेली ३-४ वर्ष चांगले कसोटी क्रिकेट खेळत आलो आहोत.”

भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील या अंतिम सामन्यापूर्वी ‘बेस्ट ऑफ थ्री’ पर्याय हा अंतिम सामन्यासाठी योग्य असता असे सुचविले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

चाहते का म्हणतायेत ‘काळ्या जिभेचा आकाश चोप्रा’ ? जाणून घ्या पूर्ण प्रकरण

भारताला पराभूत केल्यानंतरही न्यूझीलंडने जिंकली मनं, ‘या’ शब्दात मानले आभार

‘तुम्ही यासाठी पात्र होता’, न्यूझीलंडच्या विजयानंतर रवी शास्त्री यांनी दाखवली खिलाडूवृत्ती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---