भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची टी२० मालिका पार पाडली. या मालिकेत भारताने ३-० असा विजय मिळवला. आता या मालिकेनंतर उभय संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना २५ नोव्हेंबरला कानपूरमध्ये सुरू होईल. टी२० मालिकेत विश्रांतीवर असलेला न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन कसोटी मालिकेत संघात पुनरागमन करणार आहे. कर्णधार केन विलियम्यन मालिकेतील पहिल्या सामन्यात एक खास विक्रम नावावर करू शकतो.
कर्णधार केन विलियम्सनने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत न्यूझीलंड संघासाठी ७२३० धावा केल्या आहेत. अशात विलियम्सनने जर भारताविरुद्ध पहिल्या कसोटी समान्यात मोठी खेळी केली, तर तो कसोटी क्रिकेटमधील तीन दिग्गजांना मागे टाकू शकतो. त्याने जर या सामन्यात ८२ धावा केल्या, तर त्याला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तीन स्थानांचा फायदा होईल.
विलियम्सनने जर पहिल्या सामन्यात ही अपेक्षित खेळी केली तर, तो इंग्लंडचा माजी खेळाडू वॅली हॅमंड, दक्षिण अफ्रिकेचा गॅरी कर्स्टन आणि तिसरा खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा दिग्गज डेविड वार्नरला मागे टाकू शकतो
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांचा विचार केला तर, भारताचा सचिन तेंडूलकरने सर्वाधित १५९२१ धावा केल्या आहेत. सचिनचा विक्रम आजपर्यंत कोणताच फलंदाज मोडू शकला नाही.
विलियम्सनकडे ज्या तीन फलंदाजांची विक्रम मोडण्याची संधी आहे, त्यातील पहिला वॅली हॅमंड. हॅमंडने इंग्लंडसाठी खेळलेल्या ८५ कसोटी सामन्यांतील १४० डावांमध्ये ५८.५ च्या सरासरीने ७२३९ धावा केल्या आहेत. तर कर्स्टनने दक्षिण अफ्रिकेसाठी खेललेल्या १०१ कसोटी सामन्यांमतील १७६ डावांमध्ये ४५.३ च्या सरासरीने ७२८९ धावा केल्या आहे. तसेच वार्नरने खेळळेल्या ८६ कसोटी सामन्यांमधील १५९ डावात ४८.१ च्या सरासरीने ७३११ धावा केल्या आहेत.
दरम्यान, विलियम्सनडे ज्या तीन फलंदाजांचा विक्रम मोडण्याची संधी आहे, त्यापैकी दक्षिण अफ्रिकेच्या गॅरी कर्स्टनने यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद भुषवले आहे. कर्स्टनच्या मार्गदर्शनाखाली भारताने २०११ विश्वचषक जिंकला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघात ‘या’ तिघांचे स्थान सर्वात मजबूत, २०२३ विश्वचषकापर्यंत संघाबाहेर होण्याची शक्यता कमीच
दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत कानपूर कसोटीसाठी ‘अशी’ असू शकते टीम इंडियाची ‘प्लेइंग इलेव्हन’