टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना बुधवारी (9 नोव्हेंबर) पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघात पार पडला. सिडनी क्रिकेट ग्राऊंड येथे झालेल्या या सामन्यात पाकिस्तान संघाने अखेरच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विजय मिळवला. या विजयामुळे पाकिस्तानने थेट अंतिम सामन्यात स्थान मिळवले. पाकिस्तानच्या विजयामुळे न्यूझीलंडचे मर्यादित षटकांच्या स्पर्धेचे आयसीसी विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न आणखी काही काळ लांबले. सलग चौथ्या आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत कर्णधार म्हणून खेळण्याचा मान केन विलियम्सन याला मिळाला नाही.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विजयाचे दावेदार म्हणून न्यूझीलंड संघ सहभागी झाला होता. मात्र, पाकिस्तानने खेळाच्या तीनही प्रकारात न्यूझीलंडला मात देत अंतिम फेरीत जागा मिळवली. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा टी20 विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्यापासून त्यांना वंचित रहावे लागले.
न्यूझीलंडच्या पराभवामुळे त्यांचा कर्णधार केन विलियम्सन हा पुन्हा एकदा कमनशिबी ठरला. त्याच्या नेतृत्वात न्यूझीलंड संघ सातत्याने आयसीसी स्पर्धांच्या उपांत्य फेरी अथवा अंतिम फेरी धडक देत आहे. सर्वात आधी 2016 टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत त्यांनी मजल मारलेली. 2019 वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत त्यांना दुर्दैवीरीत्या पराभूत व्हावे लागले होते. अंतिम सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये देखील सामना बरोबरीत राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकारांच्या नियमानुसार इंग्लंडला विजेते घोषित केले गेले.
त्यानंतर 2021 जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत त्यांनी भारतीय संघाला पराभूत करत विजेतेपद पटकावले. त्याच वर्षा अखेरीस युएई येथे झालेल्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर आता ते सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचू शकले नाहीत. या दरम्यान संघाचे नेतृत्व एकटा केन विलियम्सन करत होता. याच सोबत केन 2015 वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही सहभागी झालेला. मात्र, त्यावेळी तो संघाचा उपकर्णधार होता. (Kane Williamson Lost Four World Cup Knock Out In Six Year)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपात श्रीलंकन खेळाडू अटकेत, आता बोर्ड म्हणतंय, ‘आम्ही उचलणार खर्च’
पाकिस्तानने न्यूझीलंडला रोखलं! अंतिम फेरी गाठण्यासाठी बाबर सेनेसमोर 153 धावांचे लक्ष