श्रीलंका संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. उभय संघांतील कसोटी मालिकेचा पहिला सामना न्यूझीलंडने 2 विकेट्से जिंकला. मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (17 मार्च) वेलिंग्टनमध्ये सुरू झाला. पहिल्या डावात न्यूझीलंडने 4 बाद 580 धावा केल्या. त्यांचा माजी कर्णधार केन विलियम्सन याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 6वे द्विशतक शनिवारी (18 मार्च) सुरू केले. मालिकेतील हे त्याचे 5वे कसोटी द्विशतक ठरले आणि याचसोबत एका खास विक्रमाची नोंद देखील त्याच्या नावावर झाली.
आपल्या कसोटी कारकिर्दीतील मायेदेशात सर्वाधिक द्विशतके करण्याचा विक्रम शर डॉन ब्रॅढमन यांच्या नावावर आहे. ब्रॅडमनने मायदेशातील कसोटी सामन्यांमध्ये एकूण 7 द्विशतके केली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर भारतीय दिग्गज विराट कोहली (Virat Kohli) आहे. विराटने मायदेशात एकूण 6 कसोटी द्विशतके ठोकली आहेत. तिसऱ्या क्रमांकावरील कुमार संगकारा (K Sangakkara) यानेही 6 कसोटी द्विशतक मायदेशात केले आहेत. केन विलियम्सन (Kane Williamson*) या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे, ज्याने असी कामगिरी 5 वेळा केली आहे. ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याने 5 कसोटी द्विशतकांसह यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
मायदेशातील कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक द्विशतके
7 – डॉन ब्रॅडमन
6 – विराट कोहली
6 – कुमार संगकारा
5 – केन विलियम्सन
5 – रिकी पाँटिंग
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर न्यूझीलंडच्या खेळाडूंनी श्रीलंकेचा चांगलाच घाम काढल्याचे पाहायला मिळाले. श्रीलंकन संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, पण गोलंदाजांना अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. पहिल्या डावात न्यूझीलंडसाठी विलियम्सनने 296 चेंडूत 215 धावा केल्या. तर हेन्री निकोल्स () याने नाबाद 200 धावांची खेळी केली. संघाची धावसंख्या 580 झाल्यानंतर कर्णदार टिम साउदी याने डाव घोषित केला. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंका संघाने 2 बाद 26 धावा केल्या.
(Kane Williamson made a special record by scoring a double century in the Wellington Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एका पराभवाने खचला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर; म्हणाला, ‘आम्ही राहुलसारखी फलंदाजी…’
आधी राहुलला नाही तसलं बोलला भारतीय दिग्गज, आता वादळी खेळी पाहून म्हणाला, ‘दबावातही चांगला खेळलास…’






