---Advertisement---

मोठी बातमी! केन विल्यमसननं न्यूझीलंडचं कर्णधारपद सोडलं, केंद्रीय करारही नाकारला

On: बुधवार, जून 19, 2024 7:45 AM
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 मध्ये स्थान न मिळवू शकलेल्या न्यूझीलंडच्या टीमचा कर्णधार केन विल्यमसन यानं मोठा निर्णय घेतला आहे. किवी कर्णधारानं न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा केंद्रीय करार नाकारला आहे. याशिवाय त्यानं मर्यादित षटकांच्या कर्णधारापदावरून हटण्याचाही निर्णय घेतला आहे.

केन विल्यमसन यानं कसोटी कर्णधारपद यापूर्वीच सोडलं होतं. केंद्रीय करार नाकारल्यामुळे विल्यमसन क्रिकेटमधून निवृत्ती घेणार का? असा प्रश्न उभा राहतो. मात्र याचं उत्तर नाही असं आहे. केन विल्यमसन अजूनही न्यूझीलंडसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणार आहे.

न्यूझीलंडसाठी 350 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या 33 वर्षीय केन विल्यमसननं केंद्रीय करारातून आपलं नाव मागे घेतलं आणि मर्यादित षटकांचं कर्णधारपद देखील सोडलं. या निर्णयाचा त्याला फायदाच होईल. कारण तो आता आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरवर फोकस करू शकेल.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं पुष्टी केली आहे की, केन विल्यमसन पुढील 8 कसोटी सामन्यांमध्ये किवी संघासाठी खेळताना दिसेल. हे कसोटी सामने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतर्गत येतात. याशिवाय विल्यमसन पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील खेळताना दिसेल. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाद्वारे करारबद्ध खेळाडूंना किवी संघ आणि घरेलू सुपर स्मॅश स्पर्धेसाठी देखील उपलब्ध राहावं लागतं. मात्र विल्यमसनची असं करण्याची इच्छा नाही.

केन विल्यमसननं स्पष्ट केलं आहे की, तो अजूनही किवी संघासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्यास उत्सुक आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, देशाचं प्रतिनिधित्व करणं ही अजूनही त्याच्यासाठी पहिली प्राथमिकता आहे. न्यूझीलंडच्या खेळाडूंनी बोर्डाच्या केंद्रीय करारापासून दूर राहणं ही काही नवीन गोष्ट नाही. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टनं देखील हे पाऊल उचललं आहे. मात्र तरीही तो देशासाठी खेळताना दिसलाय.

महत्त्वाच्या बातम्या – 

2026चा टी20 विश्वचषक खेळणार का? केन विल्यमसननं दिली प्रतिक्रिया
युवराज सिंगवर येणार चित्रपट! वडील योगराज सिंग यांनी दिली प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ
विराट समोर शाहरुख-सलमान फिके; किंग कोहली भारतातील सर्वात माैल्यवान सेलिब्रिटी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---