न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विलियम्सन याला आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात दुखापत झाली. विलियम्सन आयपीएलचा गतविजेता संग गुजरात टायटन्ससाठी क्षेत्ररक्षण करताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. आता या दुखापतीविषयी मोठी बातमी समोर येत आहे. दुखापतीमुळे विलियम्सनला भारतात होणाऱ्या आगामी वनडे विश्वचषकातून माघार घ्यावी लागू शकते.
आयपीएल 2023 (IPL 2023) चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (GT vs CSK) यांच्यात अहमदाबादमध्ये खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात गुजरातने 5 विकेट्स राखून विजय मिळवला. पण त्यांचा प्रमुख फळंदाज केन विलियम्सन (Kane Williamson) याला फलंदाजी करता आली नाही. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यादरम्यानच सीमारेषेजवळ एक झेल पकडण्याच्या नादाद विलियम्सनला दुखापत झाली. आता अशी माहिती समोर येत आहे की, विलियम्सनची ही दुखापत जास्त गंभीर आहे. याच कारणास्तव तो आगामी वनडे विश्वचषकातून बाहेर होऊ शकतो. न्यूझीलंड संघासाठी ही एक चिंतेची बाब बनली आहे.
न्यूझीलंड क्रिकेटने विलियम्सनच्या हवाल्याने माहिती दिली आहे की, “मागच्या काही दिवसांमध्ये मला खूप चांगला सपोर्ट मिळाला आहे. यासाठी मी गुजरात टायटन्स आणि न्यूझीलंड क्रिकेटचे आभार मानतो. अशी दुखापत होणे म्हणजे खूप निराशाजनक आहे, पण माझे लक्ष सध्या शस्त्रक्रिया आणि यातून सावरण्यावर आहे.” दरम्यान, आयपीएल हंगामाच्या पहिल्याच सामन्यात दुखापत झाल्याने विलियम्सन संपूर्ण हंगामातून बाहेर पडला. तसेच दुखापतीवर उपचार घेण्यासाठी तो मायदेशात देखील परतला आहे. मंगळवारी (4 एप्रिल) ऑकलँडमध्ये पोहोचल्यानंतर त्याने गुडघ्याचे स्कॅन केले, ज्यामध्ये ही दुखापत गंभीर असल्याचे समोर आले. याच पार्श्वभूमीवर विलियम्सनला गुडघ्याची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे आणि आगामी विश्वचषकातून माघार देखील घ्यावी लागणार आहे.
असे असले तरी, न्यूझीलंड संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांच्या मते विलियम्सन विलियम्सन विश्वचषकाआधी संघात पुनरागमन करू शकतो. यावर्षीचा विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात खेळवला जाणार आहे. स्टीडच्या मते विश्वचषकासाठी अजून सहा-सात महिने वेळ आहे. दरम्यानच्या काळात विलियम्सन या दुखापतीतून सावरून संघासाठी उपलब्ध होऊ शकतो. (Kane Williamson will not play in the upcoming ODI World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धवनचे विक्रमांचे आणखी एक ‘शिखर’! यापूर्वी केवळ दोन दिग्गजांना जमलाय ‘तो’ कारनामा
युझी नंबर वन! आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज बनला चहल, अशी आहे संपूर्ण यादी