न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विलियम्सनचे कसोटी कर्णधारपद धोक्यात असल्याचे म्हटले जात आहे. तसेच त्याच्या जागी कसोटीचा नवीन कर्णधार म्हणून टॉम लॅथमला नेमण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. आता या सर्वांचे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने खंडन केले आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ०-३ने पराभूत झाल्यानंतर त्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. तसेच काही लोकांचे असे म्हणणे होते की, कसोटी, वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट प्रकारात नेतृत्व केल्यामुळे त्याच्यावर दबाव येत आहे.
अशा सर्वप्रकारच्या चर्चांचे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने खंडन करत स्पष्ट केले की, असे काही होणार नाही. विलियम्सन सध्या सर्व क्रिकेट प्रकारात न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
क्राऊड गोज वाईल्डचे प्रसारणकर्ता जेम्स मॅकोनी (James McOnie) यांनी दावा केला होता की, संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांना लॅथमला (Tom Latham) कसोटी संघाचे नेतृत्व सोपवायचे आहे. तसेच त्यांची योजना ही कर्णधार बदलण्याची आहे.
ते म्हणाले होते की, “विलियम्सनचे (Kane Williamson) कसोटी कर्णधारपद (Test Captain) धोक्यात आहे. प्रशिक्षक स्टीड हे लॅथमला कसोटीचा कर्णधार बनविण्याच्या बाजूने आहेत. यामुळे विलियम्सनला आंतरराष्ट्रीय टी२० संंघाचे कर्णधारपद सांभाळणे सोपे होईल. तसेच कामाचा अधिक ताणही पडणार नाही.”
न्यूझीलंडचा (New Zealand) संघ ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या कसोटी मालिकेत ०-३ने पराभूत झाला होता. तसेच आपल्याच देशात भारताविरुद्ध ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत ०-५ने पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर संघाने पुनरागमन करत भारताला (India) वनडे आणि कसोटी मालिकेत पराभूत केले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-हार्दिक पंड्या ‘या’ क्रमांकाची जर्सी घालून का खेळतो? ११ वर्षांनंतर उलगडले पंड्याचे गुपित
-त्याला कसोटीत न घेऊन टीम इंडियाच नुकसान झालं, त्याचं नाही
-‘या’ क्रिकेटपटूच्या घराला बसला अम्फान वादळाचा तडाखा