बुधवारपासून (14 ऑगस्ट) न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत न्यूझीलंड संघाला कसोटी क्रमवारीत भारतीय संघाला मागे टाकत अव्वल स्थान मिळण्याची संधी आहे.
सध्या न्यूझीलंड कसोटी क्रमवारीत भारताच्या पाठोपाठ 111 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर भारतीय संघ 113 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंडने जर श्रीलंकाविरुद्ध दोन्ही कसोटी सामन्यात विजय मिळवला तर ते 115 गुणांसह भारताला मागे टाकत अव्वल स्थानावर येतील.
पण याबरोबरच भारतीय संघालाही त्यांचे अव्वल स्थान पुन्हा मिळवण्याती संधी आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील 2 सामन्यांची कसोटी मालिका 22 ऑगस्ट पासून सुरु होत आहे. त्यामुळे भारतीय संघाने जर या मालिकेत 2-0 असा विजय मिळवला तर भारतीय संघ अव्वल स्थानावर कायम राहिल.
पण जर न्यूझीलंडने जर श्रीलंकेविरुद्ध दोन्ही कसोटी सामन्यात विजय मिळवला आणि भारताला वेस्ट इंडीज विरुद्ध केवळ 1 विजय मिळवता आला तरी भारताला त्यांचे कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान गमवावे लागू शकते.
याबरोबरच न्यूझीलंडला जर एकच सामना जिंकता आला तर मात्र त्यांना अव्वल स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघ विंडीज विरुद्ध दोन्ही सामने पराभूत व्हावे किंवा दोन्ही सामने अनिर्णित रहावे अशी अपेक्षा करावी लागेल.
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील कसोटी मालिका या कसोटी चॅम्पियनशिपचा भाग आहेत. त्यामुळे या चॅम्पियनशिपच्या दृष्टीनेही कसोटी क्रमवारी महत्त्वाची ठरणार आहे.
2 वर्षे चालणाऱ्या कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जून 2021 मध्ये लॉर्ड्सवर खेळवला जाईल. दोन वर्षात जे दोन संघ कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर असतील त्यांच्या अंतिम सामना पार पडेल.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–या सहा दिग्गजांपैकी एक होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक!
–या देशाच्या सर्वाधिक खेळाडूंनी खेळले आहेत ३००पेक्षा अधिक वनडे
–…म्हणून विराट कोहलीसाठी हे शतक महत्त्वाचे होते