भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमान संघाने श्रीलंकेला क्लीन स्वीप देत मालिका २-० ने जिंकली आहे. या मालिकेत भारताच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामध्ये रविंद्र जडेजा, आर अश्विन, श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत या खेळाडूंचे भारताच्या यशात मोठे योगदान आहे. रविंद्र जडेजाने तर गोलंदाजी बरोबरच फलंदाजीत देखील उत्तम कामगिरी केली आहे. याबद्दल त्याचे देशभरातून कौतुक केले जात आहे. आता भारताचा माजी अष्टपैलू कपिल देवने रविंद्र जडेजाची प्रशंसा केली आहे.
गोलंदाजीत विकेट घेण्यापासून ते खालच्या क्रमात उत्तम फलंदाजी करण्यापर्यंत जडेजाने (Ravindra Jadeja) आपल्या कौशल्याने सर्वांना प्रभावित केले आहे. याशिवाय तो कसोटीतील सर्वोत्तम अष्टपैलू बनला आहे. कपिल देव (Kapil Dev) सुद्धा जडेजाच्या प्रदर्शनावर खूप खुश आहेत आणि सौराष्ट्रात जन्मलेल्या या खेळाडूचे त्यांनी कौतुक केले आहे. त्याने मोहाली कसोटीत नाबाद १७५ धावांची खेळी खेळली आणि दोन्ही डावात मिळून ०९ विकेट्स घेतल्या. भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी कोणत्याही दबावाखाली न खेळण्याच्या रविंद्र जडेजाच्या क्षमतेची प्रशंसा केली आहे.
कपिल देव म्हणाले की, “मला नवीन खेळाडूंमध्ये रविंद्र जडेजाची खेळी आवडली. कारण, तो दबावाविना खेळतो. तो क्रिकेटचा आनंद घेतो. त्यामुळेच तो गोलंदाजीबरोबरच फलंदाजीत सुद्धा उत्तम आहे. तो क्षेत्ररक्षण सुद्धा चांगले करतो.” ते म्हणाले की, “दबावात काही ठीक केले जाऊ शकत नाही. जर तुम्ही क्रिकेट क्षेत्रात दबाव बनवला, तर तुमची कामगिरी खराब होईल.”
कपिल देव यांना जेव्हा विचारण्यात आले की, त्यांच्या सर्वात जास्त जवळ कोणते क्रिकेट मैदान आहे?, तेव्हा ते म्हणाले की, “एम. ए. चिदंबरम स्टेडियमच्या नामकरणामध्ये काही संकोच नव्हता. कारण, त्यांनी आयोजन स्थळावर एका शानदार वेळेचा आनंद घेतला.”
भारतीय संघाचे १३१ कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व केलेले कपिल देव म्हणाले की, “मा अभिमानाने सांगतो की चेपाॅक हे मैदान त्या मैदानांपैकी एक आहे, जिथे मला कधीही अपयश आलेले नाही.”
जडेजाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत नाबाद १७५ धावा आणि ९ विकेट्स घेतल्या. तसेच, दुसऱ्या कसोटीत त्याने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात २२ धावांची खेळी केली. यावेळी गोलंदाजी करताना त्याला १ विकेट घेण्यात यश आले.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी क्रिकेट झालं तब्बल १४५ वर्षांचं! कसा झाला होता सर्वात पहिला सामना, घ्या जाणून
‘मैं हारेगा नहीं साला’, माजी क्रिकेटरने पुष्पा स्टाईलमध्ये सांगितला कर्णधार रोहित शर्माचा इरादा
पीवायसी रिबाउंड रॅकेट लीग २०२२ स्पर्धेत तलवार्स व मस्किटर्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत