भारतीय संघाने १९८३ मध्ये प्रथमच वनडे विश्वचषक जिंकून इतिहास रचला. कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने २५ जून १९८३ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजला ४३ धावांनी पराभूत केले होते. कपिल देव यांनी शनिवारी (२६ जून) रोजी झालेल्या एका कार्यक्रमात विश्वचषक विजेत्या संघातील सर्वात खोडकर आणि शांत खेळाडू कोण होते, याविषयी उलगडा केला. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात या विश्वचषक विजेत्या संघातील बरेच खेळाडू सहभागी झाले होते.
भारतीय क्रिकेट इतिहासातील या सुवर्ण दिवसाला ३८ वर्षे पूर्ण झाली. या विजयानंतरच भारतीय क्रिकेटमध्ये मोठे बदल होत गेले. भारताच्या या विश्वविजेत्या संघात कर्णधार कपिल देव यांच्या व्यतिरिक्त सुनील गावसकर, मोहिंदर अमरनाथ, कीर्ती आझाद, के श्रीकांत, यशपाल शर्मा, सय्यद किरमानी, दिलीप वेंगसरकर, सुनील वलसान, बलविंदर सिंधू, रवी शास्त्री, मदनलाल, संदीप पाटील व रॉजर बिन्नी यांचा समावेश होता.
हा संघातील सर्वात सभ्य तर हे सर्वात खोडकर खेळाडू
कपिलदेव यांना या मुलाखतीत संघातील सर्वात सभ्य खेळाडू कोण व सर्वात खोडकर खेळाडू कोण याबाबत विचारले असता त्यांनी उत्तर देताना म्हटले, “सर्वात खोडकर खेळाडू म्हणाल तर, कीर्ती आझाद आणि संदीप पाटील यांची नावे घेईल. मात्र, त्यांची उपस्थितीदेखील खूप महत्वाची होती. जर सर्व क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्यासारखे राहिले तर, अवघड होते. नेहमी गंभीर वातावरणात खेळणे योग्य ठरत नाही.”
संघातील सर्वात सभ्य खेळाडू म्हणून कपिल यांनी वेगवान गोलंदाज रॉजर बिन्नी यांचे नाव घेतले. ते म्हणाले, “रॉजरला मी संघातील सर्वात सभ्य खेळाडू म्हणून इच्छितो. मी त्याला कधीही रागवताना पाहिले नाही.”
लॉर्ड्स येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने १८३ धावा केल्या होत्या. त्यानंतर, भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजचा डाव १४० धावांत गुंडाळला. सामन्यात १२ धावा देऊन ३ बळी घेणारे मोहिंदर अमरनाथ सामनावीर ठरले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
चौफेर टीका होणार्या भारतीय संघाच्या मदतीला धावला गांगुली, ‘या’ शब्दांत केली पाठराखण
“भारतीय संघाच्या दोन वर्षांच्या मेहनतीवर ‘त्या’ एका तासाने फेरले पाणी”






