---Advertisement---

टीम इंडियाची यम्मी ट्रीट! भारतीय खेळाडूंचा ‘हा’ आहे आवडता पदार्थ; पंड्या बंधू आठवड्यातून ४ वेळा करतात ऑर्डर

On: रविवार, जून 27, 2021 7:38 PM
---Advertisement---

जुलैमध्ये भारताच्या मर्यादीत क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ २८ जूनला श्रीलंकेसाठी रवाना होणार आहे. सध्या श्रीलंका दौऱ्यावर जाणारे भारताचे सर्व सदस्य मुंबईमध्ये हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहेत. यादरम्यान, भारतीय खेळाडू विविध गोष्टी करत असतानाचे काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. नुकताच एक व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. यात भारतीय संघाचा सध्याचा आवडता पदार्थ बनवला जात आहे.

बीसीसीआयने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्याला कॅप्शन दिले आहे की ‘यम्मी व्हिडिओ अलर्ट. रविवारचे जेवण निश्चित आहे. मॉक डक-व्हेजी डिलाईट सादर आहे, हा सध्याचा भारतीय संघाचा सर्वात आवडीचा पदार्थ आहे.’

या व्हिडिओच्या सुरुवातीला श्रीलंका दौऱ्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधार म्हणून निवडलेला शिखर धवन बोलताना दिसून येत आहे. शिखर म्हणाला, ‘इथे मॉक डक नावाचा एक पदार्थ बनवला जात आहे, जो मला फार आवडतो. पण तो कसा बनवला जातो, हे पुढे पाहूया.’

त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये पुढे भारतीय संघ थांबलेल्या मुंबईच्या ग्रँट हयात हॉटेलमधील शेफ मॉक डक पदार्थ कसा तयार करायचा हे दाखवत आहेत. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की हा पदार्थ युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला सर्वाधिक जास्त आवडतो. तसेच शिखर धवनला देखील हा पदार्थ आवडू लागला आहे. एवढेच नाही तर कृणाल पंड्या आणि हार्दिक पंड्या यांनी आठवड्यातून ३-४ वेळा हा पदार्थ मागवला आहे.

असा होणार आहे श्रीलंका दौरा
श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघ ३ टी२० सामन्यांची आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळवणार आहे. हा दौरा १३ ते २५ जुलै दरम्यान होईल. आधी वनडे मालिका खेळवली जाईल. त्यानंतर टी२० मालिका होईल. वनडे मालिकेतील सामने अनुक्रमे १३, १६ आणि १८ जुलै रोजी होतील; तर टी२० मालिकेतील सामने २१, २३ आणि २५ जुलै रोजी होतील. हे सर्व सामने कोलंबो येथे होणार आहेत.

युवा खेळाडूंचा संघात समावेश 
सध्या भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्याने श्रीलंका दौऱ्यासाठी अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाड, नितीश राणा, देवदत्त पडीक्कल, के गाॅथम, चेतन सकरिया, वरुण चक्रवर्ती अशा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी असणार आहे. या संघाचे कर्णधारपद शिखर धवन सांभाळणार असून भूवनेश्वर कुमार उपकर्णधार असणार आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ- शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शाॅ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चाहर, के गाॅथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुनवेश्वर कुमार (उपकर्णधार) दिपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया.
नेट गोलंदाज – इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर आणि सिमरजीत सिंग

महत्त्वाच्या बातम्या – 

“भारतीय संघाच्या दोन वर्षांच्या मेहनतीवर ‘त्या’ एका तासाने फेरले पाणी”

वनडे पदार्पण करताच ‘हा’ पराक्रम करणारी शेफाली बनली भारताची पहिली क्रिकेटपटू; इशांत शर्मालाही टाकलंय मागे

पुन्हा WTC मध्ये भिडणार भारत-न्यूझीलंड, ‘या’ महिन्यात खेळवली जाणार मालिका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---