मुंबई । कपिल देव नावाचा तरुण खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येईपर्यंत भारताला खरोखरच खरा अष्टपैलू खेळाडू कधीच मिळला नव्हता. कपिलने जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज म्हणून नाव कमवले. त्यांनी रिचर्ड हेडलीचा कसोटी विकेटचा विश्वविक्रम मोडला. त्यांच्यापासून प्रेरणा घेत आज भारतीय संघात अनेक वेगवान गोलंदाज येत आहेत. त्याचबरोबर कपिल देव यांनी फलंदाजीतही चांगली कामगिरी केली.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल यांनी अशी घटना सांगितली जी त्यांना वेगवान गोलंदाज होण्यासाठी महत्त्वाची ठरली.
ते म्हणाले, “मी 19 वर्षांखालील एका शिबिरासाठी गेलो होतो. कधी कधी अधिकारी देखील आपल्याला भारी पडत असतात. या शिबिराच्या दरम्यान एका अधिकाऱ्याची भेट झाली. ते म्हणाले तुम्ही काय करता? ‘मी म्हणालो मी वेगवान गोलंदाज आहे’. भारताकडे वेगवान गोलंदाज कधीच नव्हता, असे त्याचे उत्तर होते. त्यांनी मला प्रोत्साहन देण्याऐवजी निराश केले. मी आव्हान स्वीकारले आणि स्वतःला म्हणालो, एक दिवस मी वेगवान गोलंदाज होऊन दाखवेन.”
“मला नेहमीच नकारात्मक लोकांना सिद्ध करून दाखवायला आवडते आणि त्याचप्रमाणे वेगवान गोलंदाजी सुरू केली,” असे कपिल यांनी युट्यूबच्या एका मुलाखतीत माजी भारतीय सलामीवीर आणि विद्यमान महिला संघाचे प्रशिक्षक डब्ल्यू. व्ही. रमन यांना सांगितले.
कपिल देव यांनी 131 कसोटी सामन्यात 5248 धावा केल्या आणि 434 बळी घेतले. वनडे सामन्यात त्यांनी 253 बळी घेतले आणि 3783 धावा केल्या. 1990 च्या दशकात कपिल यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली आणि आज ते क्रिकेट समालोचक म्हणून काम करत आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
क्रिकेटमुळे या खेळाडूला मिळाली त्याची जीवनसाथी; असे जुळले प्रेम
जेव्हा गॅरी कर्स्टनसाठी धोनीने रद्द केली होती टीम इंडियाची ट्रिप
पाकिस्तानचा प्रशिक्षक खेळाडूंवर भडकला; म्हणाला हे तर धोकेबाज खेळाडू