भारत आणि ऑस्ट्रेलिया हे जागतिक क्रिकेटमधील मजबूत संघ आहे. या दोन्ही संघात बरेच रोमांचक सामने झाले आहेत. डिसेंबर 2020 मध्ये या दोन्ही संघात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना ऍडिलेड येथे खेळला जाईल. ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात देशात पराभूत करणे फार अवघड आहे. त्यामुळे विजय मिळवण्यासाठी या दौऱ्यावर भारताला उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल.
सन 1985 साली भारतीय माजी अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडिलेड येथील कसोटी सामन्यात आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले होते.
कपिल देव यांची अॅडिलेडमधील कामगिरी
सन 1985 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी खेळला गेला. या सामन्यात भारताचे स्टार अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी पहिल्याच डावात आठ बळी घेतले होते. त्यांनी 38 षटकांत 106 धावा देऊन 8 बळी घेतले होते.
कपिल देव यांना मिळाला सामनावीराचा पुरस्कार
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 381 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांनी शतके ठोकली होती. डेविड बून यांनी 123 तर ग्रेग रिची यांनी 128 धावा केल्या होत्या. हा सामना अनिर्णित राहिला आणि दिग्गज कपिल देव यांना त्यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता.
कपिल देव यांनी मालिकेत घेतले 12 बळी
ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या या कसोटी मालिकेत कपिल देव यांनी 12 बळी घेतले होते. 106 धावा देऊन 8 बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती.
सन 2018-2019 मध्ये भारताने जिंकली मालिका
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना दिवस-रात्र असेल. या दोन देशांदरम्यान 2018-19 मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने विजय मिळवला होता.
कपिल देव यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
कपिल देव यांनी 131 कसोटी सामन्यात 434 बळी घेतले आहेत. त्याचबरोबर 225 कसोटी सामन्यात 253 बळी घेतले आहे.






