---Advertisement---

रोनाल्डोने कोको-कोलाच्या बॉटल हटवल्याच्या व्हिडिओवर करिना कपूरची ‘भन्नाट’ रिऍक्शन

---Advertisement---

पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या कारकीर्दीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. परंतु त्याच्या वागणुकीमुळे तो सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी रोनाल्डोने युरोपियन चॅम्पियनशिप दरम्यान एका पत्रकार परिषदेदरम्यान कोका कोलाच्या बाटल्या बाजूला केल्या होत्या.

रोनाल्डोच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. परंतु आता सध्या या घटनेवर बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

करीना कपूरने दिली प्रतिक्रिया

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरने रोनाल्डोचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आपल्या अंदाजात तिने प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री करीना कपूरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक स्टोरी पोस्ट केली आणि त्या स्टोरीमध्ये करीनाने आपला चित्रपट ‘जब वी मेट ‘ चा प्रसिद्ध डायलॉग लिहिला होता. करीनाने लिहिले की, “कोक-सोडा आपल्या जागी, पाण्याचं काम पाणीच करते.”

करीनाच्या या पोस्टवर चाहते जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. चाहत्यांना करीनाचा हा अंदाज खूप पसंत आला. सोशल मीडियावर करीनाची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रोनाल्डोने कोका-कोलाच्या बाटल्या बाजूला केल्या

रोनाल्डोला एका दिवसात जवळ जवळ सहा वेळा स्वच्छ आणि पौष्टिक जेवण करणे आवडते. त्याचा पुरावा रोनाल्डोने युरो कप 2020 च्या सामन्या अगोदरच पत्रकार परिषद दिला होता. जेव्हा ते पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर देण्‍यासाठी पोहोचला होता, तेव्हा तिथे माइक जवळ दोन कोकाकोलाच्या बाटल्या होत्या. रोनाल्डोने त्या दोन्ही बाटल्या जागेवरून उचलून बाजूला ठेवल्या. कॅमेरा समोर त्याने पाण्याची बाटली उचलून सर्वांना संदेश दिला की, “पाणी प्या.” रोनाल्डोच्या या वर्तनामुळे कोका कोला कंपनीला फार मोठे नुकसान झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

७५ कोटींची कार अन् करोडोंची घड्याळ! जाणून घ्या जगातील सर्वात महागडी लाईफस्टाईल जगणाऱ्या खेळाडूबद्दल

रोनाल्डोनंतर आणखी एका स्टार फुटबॉलरने हटवली प्रसिद्ध ब्रँडची बाटली, व्हिडिओ व्हायरल

रोनाल्डोच्या एका व्हिडिओमुळे हंगामा, कोका-कोला कंपनीला २९ हजार कोटींचे नुकसान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---