मोहाली येथे भारत आणि श्रीलंका (INDvSL) यांच्या दरम्यान कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यासाठी केवळ २५ टक्के प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देण्यात आला होता. मात्र, बेंगलोर येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होणार आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (Chinnaswamy Stadium) १२ मार्चपासून होणार्या दिवस-रात्र कसोटी (Day-Night Test) सामन्यासाठी चाहत्यांचा उत्साह पाहता, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने मैदान क्षमतेच्या १०० टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली आहे. पूर्ण क्षमतेने स्टेडियममध्ये येण्याची परवानगी दिली आहे. वरिष्ठ भारतीय फलंदाज विराट कोहली आपले दुसरे घर मानत असलेल्या बेंगलोरमध्ये तो आपल्या कारकिर्दीतील १०१ वा कसोटी सामना खेळेल.
कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी, यापूर्वी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने केवळ ५० टक्के प्रेक्षक क्षमतेची परवानगी दिली होती. त्यानुसार १० हजारांहून अधिक तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, विक्री सुरू होताच पहिल्या दोन दिवसांची सर्व तिकिटे विकली गेली. यानंतर तिकिटांची मागणी वाढू लागली. अशा परिस्थितीत संघटनेने प्रेक्षकांना पूर्ण क्षमतेने स्टेडियममध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. कर्नाटक राज्य सरकारकडूनही परवानगी मिळाली आहे. अशा परिस्थितीत कोणतेही निर्बंध नसताना आणि प्रेक्षकांमध्ये सामन्याबद्दलचा उत्साह पाहता उर्वरित तिकिटांची विक्रीही ११ मार्चपासून सुरू होणार आहे.
सन २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा भारतात क्रिकेट सामन्यासाठी प्रेक्षकांना पूर्ण क्षमतेने स्टेडियममध्ये येण्याची परवानगी दिली जाईल. तसेच चिन्नास्वामी स्टेडियमवर २०१८ नंतर प्रथमच कसोटी सामना होत असल्याने प्रेक्षक या सामन्यासाठी उत्साहित आहेत.
महत्वाच्या बातम्या-