आयपीएल २०२२ चा चौदावा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात कोलकाता संघाने ५ विकेट्स राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात पॅट कमिन्सने त्याच्या धुव्वादार फलंदाजीने मैफील लुटली, तर दुसरीकडे असा एक खेळाडूही चर्चेत राहिला, ज्याच्यावर वय फसवणुकीमुळे बीसीसीआयने २ वर्षांची बंदी घातली होती. हा खेळाडू म्हणजे, जम्मू-काश्मीरचा रसिक सलाम. त्याने या सामन्यात कंजूष गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून देण्यात योगदान दिले.
२२ वर्षीय रसिक (Rasik Salam) मुंबईविरुद्ध त्याचा आयपीएल कारकिर्दीतील दुसरा सामना खेळण्यासाठी (Rasik Salam IPL Comeback) उतरला होता. या सामन्यादरम्यान त्याने ३ षटके गोलंदाजी केली, परंतु त्याला एकही विकेट मिळाली नाही. मात्र त्याने पहिल्या षटकापासूनच दाखवून दिले की, तो लंबी रेसचा घोडा आहे आणि आयपीएलच्या या शर्यतीत तो खूप दूरवर जाणार.
मुळचा जम्मू-काश्मीरमधील कुलग्राम जिल्ह्यातील असलेल्या रसिकने त्याच्या वेग आणि स्विंगने मुंबईचा अनुभवी फलंदाज व कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला त्रासून सोडले. त्याने त्याच्या पहिल्या षटकात केवळ ३ धावा खर्च केल्या. त्याच्या या षटकावेळी रोहित आणि इशान किशन खेळपट्टीवर होते. आयपीएलच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर रसिकच्या पहिल्या षटकाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या संपूर्ण सामन्यात त्याने ३ षटके टाकताना केवळ १८ धावा खर्च केल्या.
WATCH – Rasikh Salam's impressive first over on IPL debut for #KKR.
📽️📽️https://t.co/8g4dSzZSXe #TATAIPL #KKRvMI
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022
रसिक सलामवर बंदी लागण्यामागचे कारण
रसिकने २०१९ मध्येच मुंबई इंडियन्सकडून आयपीएल पदार्पण केले होते. मुंबईने त्याला २० लाखांसह त्याच्या मूळ किंमतीला विकत घेतले होते. परंतु याचवर्षी बीसीसीआयला त्याच्या वयाच्या सर्टिफिकेटमध्ये गडबड आढळली होती आणि तपासातही तो दोषी आढळला होता. त्यानंतर बोर्डाने त्याच्यावर २ वर्षांसाठी प्रतिबंध लावण्याचा निर्णय घेतला होता. परंतु बंदीच्या या २ वर्षांमध्येही त्याने मुंबई संघाची साथ दिली होती.
कमिन्स ठरला कोलकाताच्या विजयाचा नायक
मुंबईविरुद्धच्या सामन्यात कमिन्सने अष्टपैलू खेळ दाखवला. सुरुवातीला गोलंदाजी करताना त्याने ४ षटकांमध्ये ४९ धावा देत २ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर खालच्या फळीत फलंदाजीला येत त्याने केवळ १५ चेंडू खेळताना नाबाद ५६ धावांची ताबडतोब खेळी खेळली आणि मुंबईच्या जबड्यातून सामना खेचून घेतला.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेट किटमध्ये इंजीनिअरिंगची पुस्तके बाळगणारा ‘हा’ पठ्ठ्या लढवतोय आरसीबीचा किल्ला
IPL 2022| सलग तीन पराभवांनंतर चेन्नई – मुंबईची प्लेऑफची समीकरणे आहेत तरी कशी?
IPL 2022 | कर्णधार रोहित शर्माच्या चेहऱ्याचा उडाला रंग, सलग तिसऱ्या पराभवानंतरची रिएक्शन व्हायरल