भारतात आलेल्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा फटका इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामालाही बसला. ही स्पर्धा भारतात सुरु असतानाच कोरोना व्हायरसने संघांच्या बायोबबलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काही क्रिकेटपटू आणि संघांची निगडीत व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यामुळे अखेर मंगळवारी (४ मे) आयपीएलचा १४ वा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला.
बीसीसीआय आणि आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने घेतलेल्या या निर्णयामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये मात्र, निराशा पसरली. यामध्ये इंग्लंड महिला संघाची क्रिकेटपटू केट क्रॉसचाही समावेश आहे. तिनेही आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित झाल्याबद्दल निराशा व्यक्त केली होती. पण याबरोबरच खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या निर्णयाला तिने पाठिंबाही दिला होता. पण तिन निराशा व्यक्त केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने खास भेट पाठवली आहे.
चेन्नई सुपर किंग्सने केटला संघाची जर्सी भेट दिली आहे. याबद्दल केटनेच स्वत: सोशल मीडियावर माहिती दिली आहे. तिने चेन्नईची जर्सी घातलेला फोटो ट्विटरवर शेअर करत लिहिले की ‘चेन्नई सुपर किंग्स माझी पहिली सीएसके जर्सी पाठवल्याबद्दल खूप धन्यवाद. जेव्हा ही स्पर्धा सुरु होण्यासाठी सर्वकाही सुरक्षित असेल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला पाठिंबा देईल.’
https://twitter.com/katecross16/status/1389562068093882374
केट ही आयपीएलची मोठी चाहती आहे. त्यामुळे जेव्हा आयपीएलचा १४ वा हंगाम स्थगित झाला होता, तेव्हा निराशा व्यक्त करताना ट्विट केले होते की ‘ही बातमी ऐकून (आयपीएल स्थगितीची) निराश झाले पण हा योग्य निर्णय आहे. क्रिकेटच्या आधी आरोग्य महत्त्वाचे आहे. मी त्या सर्व लोकांसाठी प्रार्थना करते जे भारतात कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहेत.’
https://twitter.com/katecross16/status/1389500511230078982
केटची कारकिर्द
इंग्लंडकडून क्रिकेट खेळणाऱ्या केटने आत्तापर्यंत ३ कसोटी सामने, २८ वनडे आणि १३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. तिने कसोटीत १४ विकेट्स, वनडेत ३५ विकेट्स आणि आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ११ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पृथ्वी शॉच्या कथित गर्लफ्रेंडचा जबराट बेली डान्स; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘आहा, काय नाचतेस’!






