---Advertisement---

पृथ्वी शॉच्या कथित गर्लफ्रेंडचा जबराट बेली डान्स; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘आहा, काय नाचतेस’!

On: बुधवार, मे 5, 2021 6:40 PM
---Advertisement---

आयपीएल 2021 स्पर्धा अर्ध्यातच स्थगित झाली असली तरी, ही स्पर्धा दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉसाठी फारच यशस्वी ठरली. पृथ्वीने संपूर्ण हंगामादरम्यान शानदार कामगिरी करत दिल्ली कॅपिटल्सच्या सातत्यपूर्ण उत्तम कामगिरीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. पृथ्वी हा आपल्या खेळाबरोबरच आपल्या व्यक्तिगत जीवनामुळे देखील कायम चर्चेत असतो.

मागील काही दिवसांपासून पृथ्वीचे नाव टीव्ही कलाकार प्राची सिंग सोबत अनेक वेळा जोडले गेले आहे. या दरम्यानच प्राची पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकताच प्राचीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे आपल्या डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे.

प्राचीने अक्षय कुमारच्या चांदणी चौक टू चायना या चित्रपटातील, “तेरे नैना मेरे नैना,” या गाण्यावर शानदार बेली डान्स केला आहे. प्राचीचा हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात वायरल होत असून, नेटकरीही त्याला पसंत करत आहेत. प्राचीच्या या व्हिडीओ मधील तिचे डान्स कौशल्य निश्चितच वाखाणण्याजोगे आहे.

https://www.instagram.com/p/CN-NdMbpQrH/

पृथ्वी व प्राची मधील नात्याची अजून तरी दोघांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर ते कायमच वेगवेगळ्या कमेंट्स करत असतात. दोघांमधील या संभाषणाद्वारेच चाहत्यांमध्ये त्यांच्या दोघांच्या नात्याची चर्चा होत असते.

दरम्यान प्राचीचा विचार केला असता, ती टीव्ही सिरीयल मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. तिची सर्वात प्रसिद्ध सिरीयल कलर्स वाहिनीवरील उडान ठरली आहे. अभिनयासोबतच प्राची एक उत्कृष्ट डान्सर असून, सोशल मीडियाद्वारे ती अनेक वेळा आपले डान्स व्हिडिओ शेअर करत असते. तर दुसरीकडे पृथ्वी देखील आपल्या करिअरमध्ये एक मोठी झेप घेण्याच्या तयारीत असून, भारतीय संघात त्याचे पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

आहा कडकच ना! मैदानावर चौकार- षटकारांचा पाऊस पाडणारा हार्दिक पंड्या बनलाय कूक, वहिनींनी शेअर केला व्हिडिओ

आयपीएलच्या ‘या’ सामन्यादरम्यान खोटी ओळख दाखवत मैदानात खुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या २ सट्टेबाजांना अटक

वी विल बी बॅक! आयपीएल १४ स्थगित झाल्याने ‘या’ संघांना सर्वाधिक फायदा, करणार जोरदार पुनरागमन?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---