पुणे, 31 ऑक्टोबर, 2023: कुंटे चेस अकादमी आणि मिलेनियम नॅशनल स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने व किंडर स्पोर्ट्स एलएलपी यांच्या सहकार्याने आयोजित दुसऱ्या मिलेनियम नॅशनल स्कुल व कुंटे चेस अकादमी पुरस्कृत विविध वयोगटातील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत कविश लिमये, वेदांत काळे, शाश्वत गुप्ता, प्रथमेश शेरला यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
कर्वेरोड येथील मिलेनियम स्कुल, कर्वेरोड येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सातव्या फेरीत 9 वर्षाखालील गटात फेरीत कविश लिमयेने मिहीका बोलेचा पराभव करून 6.5 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. 11 वर्षाखालील गटात वेदांत काळेने युग बराडीयाला बरोबरीत रोखले व 6.5 गुणांसह विजेतेपद पटकावले. 13 वर्षाखालील गटात प्रथमेश शेरलाने अभिजय वाळवेकरचा पराभव करून 6.5 गुण मिळवले व प्रथम क्रमांकासह विजेतेपदाचा मान पटकावला. 15 वर्षाखालील गटात शाश्वत गुप्ता व अनय उपलेंचवर यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. पण शाश्वतने 6 गुणांसह विजेतेपद पटकावले.
स्पर्धेत एकूण 32000रुपयांची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीडीसीसीचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे आणि मिलेनियम नॅशनल स्कुलचे अभिमन्यू वकील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभिषेक केळकर आदी मान्यवर उपस्थित होते. (Kavish Limaye, Vedant Kale, Shashtav Gupta, Prathamesh Sherla won the open chess tournament.)
सविस्तर निकाल:
9 वर्षाखालील गट: सातवी फेरी:
कविश लिमये(6.5गुण) वि.वि.मिहीका बोले(5गुण);
अयान सोनिग्रा(5गुण) पराभुत वि. अर्जुन कौलगुड(6.5गुण);
आयुश जगताप(5.5गुण) बरोबरी वि. वैद्य मल्हार (5.5गुण);
विराट दोडके(4.5गुण) पराभुत वि. रिजुल कुराडे(6गुण);
रोनक कोरे(5.5गुण) वि.वि.अथर्व छढा(4गुण);
11 वर्षाखालील गट:
वेदांत काळे (6.5गुण) बरोबरी वि. युग बराडीया(5.5गुण);
पुर्व चौहान (5.5गुण) बरोबरी वि. रुतम मोहगावकर (5गुण);
वरद मोरे(5गुण) बरोबरी वि. विहान देशमुख(5गुण);
चिन्मय रेड्डी (5.5गुण) वि.वि.अनिरुद्ध उदगिर(4.5गुण);
ऋषीकेश साळी (5.5गुण) वि.वि.इशान माळेचा (4.5गुण);
13 वर्षाखालील गट:
प्रथमेश शेरला(6.5गुण) वि.वि.अभिजय वाळवेकर (5गुण);
शुभम घनवट (5गुण) पराभुत वि. अर्णव कदम(6.5गुण);
श्रेयस पाटील(4.5गुण) पराभुत वि. परम जालन(5गुण);
सिया मुरंजन (4गुण) पराभुत वि. अलौकीक सिन्हा(5.5गुण);
अनिक भट्टाचार्जी(5गुण) वि.वि.विहान पाठक (4गुण);
15 वर्षाखालील गट:
शाश्वत गुप्ता(6गुण) बरोबरी विअनय उपलेंचवर(5गुण );
अद्वैत फडके (5गुण) बरोबरी वि. हेरंब इंगळे(5गुण);
अन्वय माळी(4.5गुण) वि.वि.अर्पित गजभिये (4गुण);
ओजस पिल्ले(3.5गुण) पराभुत वि. अन्वय झेंडे (4.5गुण);
शर्विल चौरीदुले (4.5गुण) वि.वि.द्विजेश दत्ता(3गुण).