आयपीएल 2023 चा 14 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला गेला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात यजमान संघाने उत्कृष्ट सांघिक कामगिरीचे दर्शन घडवले. हैदराबाद संघाने हंगामातील पहिला विजय मिळवत आपल्या गुणांचे खाते उघडले. त्याचवेळी सनरायझर्स हैदराबाद संघाची संघ मालकीण असलेली काव्या मारन संतापलेली दिसली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सलग दोन पराभवानंतर सनरायझर्स हैदराबादला रविवारी आपला पहिला विजय मिळाला. यानंतर सनरायझर्सचे चाहते चांगलेच आनंदी होते. मात्र, सामन्यात एक वेळ अशी आली होती ज्यावेळी पंजाब संघ पुनरागमन करताना दिसला. त्याचवेळी कॅमेरामनने स्टॅन्डमध्ये बसलेली सनरायझर्स संघाची मालकीण काव्या तिच्याकडे कॅमेरा केला. त्यावर तिने नाराजी व्यक्त करत ‘हट यार’ असे शब्द उच्चारल्याचे दिसून आले.
https://twitter.com/nani71224/status/1645116810587697153?t=yIKrOwuxLpFQqGE8GyWKiw&s=19
काव्या ही आयपीएलवेळी नेहमीच चर्चेत असते. आयपीएल लिलावापासून सामन्या दरम्यान प्रत्येक वेळी संघाला पाठिंबा देण्यासाठी येते. ती मैदानावर असल्यास वारंवार तिच्याकडे कॅमेरा जातो. सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे.
या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, सलग दोन पराभवानंतर हैदराबाद संघ घरच्या मैदानावर विजय मिळवण्यासाठी इच्छुक होता. संघाच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत पंजाबला फार मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. मयंक मार्कंडे याने सर्वाधिक चार, तर जेन्सन व मलिक यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. पंजाबसाठी कर्णधार शिखर धवनने नाबाद 99 धावांची खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना राहुल त्रिपाठीने नाबाद अर्धशतकी खेळी करून सनरायझर्सला आठ गडी राखून मोठा विजय मिळवून दिला. दुसरीकडे पंजाबचा हा स्पर्धेतील पहिलाच पराभव ठरला.
(Kavya Maran Upset After Cameraman Show Her On Screen In SRHvPBKS Match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये धमाका करणारे सात भारतीय फलंदाज, मागचा संपूर्ण आठवडा यांच्याच नावावर
पंजाबला नमवत सनरायझर्सने खोलले विजयाचे खाते! मार्कंडे-त्रिपाठी ठरले नायक