---Advertisement---

कोन बनेगा करोडपतीमध्ये विचारण्यात आला कुस्तीबद्दल ‘हा’ प्रश्न

On: गुरूवार, ऑक्टोबर 29, 2020 9:55 PM
---Advertisement---

अमिताभ बच्चन निवेदन करत असलेला कोन बनेगा करोडपती हा एक लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयांवर विविध प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांवर बक्षीस रक्कमही जो व्यक्ती हा खेळ खेळतो त्याला मिळत असते. या कार्यक्रमातील 27 ऑक्टोबरच्या भागात एक कुस्तीवरील प्रश्न विचारण्यात आला होता.

या भागात गुजरातमधील डॉ. श्रुती सिंग या हॉट सीटवर होत्या. त्यांनी 12.50 लाख रुपये जिंकले होते. यावेळी त्यांना कुस्तीवरील एक प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न 25 लाखांसाठी होता. तो प्रश्न होता आशियाई खेळात (एशियन गेम्स) कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकणारी प्रथम भारतीय महिला कोण? या प्रश्नासाठी पर्याय होते, अ) गीता फोगट, ब) विनेश फोगट, क) बबिता फोगट आणि ड)साक्षी मलिक.

या प्रश्नाचे योग्य उत्तर विनेश फोगट असे होते. पण डॉ. श्रुती यांनी साक्षी मलिक असे उत्तर दिले.

कोण आहे विनेश फोगट? 

विनेश फोगट ही भारतीय स्टार कुस्तीपटू आहे. तिच्या कुटुंबातच कुस्तीचा वारसा आहे. तिच्या चूलत बहिणी गीता फोगट आणि बबिता फोगट असून त्यांनीही आंतरराष्ट्रीय स्थरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत पदकेही जिंकली आहेत.

विनेशने 2014 आणि 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. तर 2018 च्या एशियन गेम्समध्ये तिने सुवर्णपदक जिंकले आहे, तर 2014मध्ये कांस्यपदक जिंकले आहे. ती पहिली पहिला कुस्तीपटू आहे, जिने राष्ट्रकुल आणि एशियन गेम्समध्ये सुपर्णपदकाची कमाई केली आहे.

तिला अर्जून पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

सात महिन्यांनंतर भारतीय महिला कुस्तीपटूंच्या सरावाला सुरवात

विश्व कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये ‘या’ देशाचा संघ नाही होणार सहभागी

मनजीत आणि सुशील कुमारची कुस्तीत दोस्ती!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---