देशभरात सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे या गणेशोस्तवाच्या काळात दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविकांची गर्दी होते. यामध्ये अनेक सेलिब्रेटीही दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात.
आज भारताचा क्रिकेटपटू केदार जाधवनेही कुटुंबासह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन आरती केली. तसेच त्याने बाप्पाकडे आई-वडीलांची तंदुरुस्तीसाठी प्रार्थना केली आहे. त्याचबरोबर भारतीय संघाला जे यश मिळाले त्यासाठी त्याने बाप्पाचे आभार मानले आहेत.
भारताच्या क्रिकेट संघातील मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधव याने आज कुटुंबासह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन आरती केली. #GanpatiBappaMorya #म #मराठी @Mazi_Marathi @MarathiRT @MarathiBrain @DagdushethG @JadhavKedar pic.twitter.com/xIZoqlo1Ku
— Maha Sports (@Maha_Sports) September 6, 2019
केदार दर्शन घेऊन झाल्यावर असेही म्हणाला की ‘मी नेहमी बाप्पाकडे मागत असतो. यावेळी फक्त आभार मानले आहेत.’
भारताच्या क्रिकेट संघातील मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधवने आज आई वडिलांची तंदुरुस्ती बाप्पाकडे मागितली तसेच भारतीय संघाने क्रिकेटमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल बाप्पाचे आभार मानले. #म #मराठी @mazi_marathi @marathirt @marthibrain #GanpatiBappaMorya @JadhavKedar @DagdushethG pic.twitter.com/09cxGB4q2R
— Maha Sports (@Maha_Sports) September 6, 2019
केदारने भारताकडून शेवटचा सामना वेस्ट इंडीज दौऱ्यात 14 ऑगस्टला खेळला आहे. तसेच त्याआधी केदार इंग्लंडमध्ये पार पडलेल्या 2019 विश्वचषकात भारताकडून खेळला आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–ऍशेसमध्ये अशी कामगिरी करणारा स्टिव्ह स्मिथ पहिलाच फलंदाज!
–तब्बल १२५ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाकडून टिम पेनने केला असा मोठा कारनामा
–स्टिव्ह स्मिथने मास्टर ब्लास्टर तेंडूलकरपेक्षा १५ डाव कमी खेळताना केला मोठा पराक्रम