---Advertisement---

क्रिकेटपटू केदार जाधव याच्या वडिलांबाबत धक्कादायक ब्रेकिंग!

On: सोमवार, मार्च 27, 2023 7:34 PM
Kedar Jadhav with father
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी खेळाडू केदार जाधव याचे वडील महादेव जाधव बेपत्ता आहेत. पुणे पोलिसांकडे ते बेपत्ता असल्याचे तक्रार आली आहे. जाधव कुटुंबिय पुण्यातील कोधरूड परिसरात राहतात. सकाळी 11.30 च्या सुमारास महादेव घरातून बाहेर पडले होते. पण त्यानंतर अद्याप त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाहीये.

पोलिसांनी या प्रकरणात माहिती दिली की, केदार जाधव (Kedar Jadhav) याचे वडील पुण्यातून बेपत्ता झाले आहेत. पुण्यातील कोथरूड भागात केदार कुटुंब राहते. सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास महादेव जाधव (Mahadev Jadhav) हे घरातून बाहेर पडले होते, जे अद्याप घरी परतले नाहीत. सकाळी रिक्षा करून ते घरातून बाहेर पडले होते आणि त्यांच्याकडील मोबाईल देखील बंद असल्याचे सांगितले जात आहे.

Kedar Jadhav father
Photo courtesy: Instagram/Kedar Mahadev Jadhav

वडील बेपत्ता असल्याने केदार जाधवच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरूनही समोर आले. केदारने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीला वडिलांचा फोटो शेअर केला आहे. सोपतच मराठीत संदेश लिहिला आहे की, “महादेव (दादा) जाधव, वय अंदाजे 85 वर्ष. दिनांक 27-03-2023 रोजी सकाळी 11.30 वाजता फिरायला गेले असता स्मृतीभ्रंशामुळे कोथरूड येथून हरवले आहेत. सापडल्यास तत्काळ संपर्क करा.” याचसोबत स्टोरीमध्ये अथर्व नावाच्या एका व्यक्तिची मोबाईल क्रमांक देखील शेअर केला गेला आहे. (Kedar Jadhav’s father Mahadev Jadhav is missing)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी फलंदाज सूर्याच्या एक पाऊल पुढे! सलग 4 सामन्यात खोलले नाही खाते, तीन वर्षापासून…
मुंबई इंडियन्सच्या विजयाला वादाची काळी किनार! शफालीला बाद देण्यावरून उलटसुलट चर्चा सुरू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---