अँटिग्वा। आजपासून (22 ऑगस्ट) भारतीय क्रिकेट संघाची वेस्ट इंडीज विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना सर विवियन रिचर्डसन स्टेडीयमवर होणार आहे.
पण या मालिकेआधीच वेस्ट इंडीजला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अष्टपैलू क्रिकेटपटू किमो पॉल डाव्या पायाच्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या ऐवजी वेस्ट इंडीजने गोलंदाज मिगल कमिन्सला संघात संधी दिली आहे .
तसेच पहिल्या सामन्यातून किमो पॉल बाहेर पडला असला तरी तो संघाबरोबर कायम राहणार असून संघ व्यवस्थापनाला तो दुसऱ्या कसोटीसाठी फिट होईल, अशी अपेक्षा आहे.
पॉलचा बदली खेळाडू म्हणून पहिल्या कसोटीसाठी निवड झालेल्या कमिन्सने तीन वर्षांपूर्वी भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत 13 कसोटी सामने खेळले असून यात त्याने 27 विकेट्स घेतल्या आहेत.
आजपासून सुरु होणारी वेस्ट इंडीज विरुद्ध भारत ही कसोटी मालिका आयसीसी कसोटी चॅम्पियनशीपचा भाग असणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याला आज भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–भारत-विंडीज संघात आजपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटीबद्दल सर्वकाही…
–कर्नाटकला दोनदा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून देणारा विनय कुमार आता खेळणार या संघाकडून
–स्मिथच्या दुखापतीनंतर बीसीसीआयने हेल्मेटच्या बाबतीत घेतला हा मोठा निर्णय