कोची: केरळ उच्च न्यायालयाने सोमवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) क्रिकेटपटू एस. श्रीसंतवर आजीवन बंदी उठवण्याचा आदेश दिला आहे. श्रीसंत वर स्पॉट फिक्सिंगच्या आरोप होता.
श्रीसंतने मार्च महिन्यात दाखल केलेल्या याचिकेवर विचार करून न्यायालयाने हा आदेश जारी केला. २०१५ मध्येच दिल्ली न्यायालयाने त्याला निर्दोष ठरविले होते पण बीसीसीआयने त्याच्यावरची बंदी मागे घेतली नव्हती. २०१३ च्या इंडियन प्रीमियर लीग मध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याच्या आरोपांवर बीसीसीआयने त्याला आजीवन बंदी घातली होती.
बंदीला आव्हान देत श्रीशांतने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होते, बंदी न उठवणे हे त्याच्या संवैधानिक अधिकारांच्या विरोधात आहे असे त्याचे म्हणणे होते. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर बीसीसीआयने त्यांच्यावर बंदी घातली होती आणि गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण कोर्टाने त्याला माफी दिली आणि त्याच्यावरची बंदी उठवण्याचा आदेश दिला.