---Advertisement---

वनडे विश्वचषकात सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्या फलंदाजाने केली निवृत्तीची घोषणा

On: शुक्रवार, जून 18, 2021 6:42 PM
---Advertisement---

आयर्लंड संघाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू केव्हिन ओब्रायनने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ओब्रायन आपल्या आक्रमक आणि स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जायचा. आयर्लंडला आपल्या आक्रमक फलंदाजीने त्याने अनेक सामने जिंकवून दिले आहेत. मात्र त्याने आज वयाच्या ३७व्या वर्षी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.

विश्वचषकात सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम
वनडे विश्वचषकात सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम केव्हिन ओब्रायनच्या नावावर आहे. २०११ साली भारतात आयोजित करण्यात आलेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेत त्याने हा कारनामा केला होता. इंग्लंडविरुद्ध बंगलोर येथे झालेल्या साखळी सामन्यात आयर्लंडला ३२८ धावांचे विशाल लक्ष्य मिळाले होते. या लक्ष्याचा पाठलाग करतांना त्यांची एकवेळ ५ बाद १११ अशी अवस्था झाली होती. त्यावेळी इंग्लंडने सहजपणे सामना आपल्या नावे करण्याचे स्वप्न पाहिले होते.

मात्र केव्हिन ओब्रायनने त्यांच्या या स्वप्नावर पाणी फेरले. त्याने तुफानी फलंदाजी करत अवघ्या ५० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. वनडे विश्वचषकाच्या इतिहासातील आजही हे सर्वात वेगवान शतक आहे. या सामन्यात त्याने ६३ चेंडूत ११३ धावांची खेळी केली. याच जोरावर आयर्लंडने इंग्लंडला पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला.

https://twitter.com/ICC/status/1405844529584934913

केव्हिन ओब्रायनची कारकीर्द
केव्हिन ओब्रायनने आपल्या कारकिर्दीत आयर्लंडतर्फे १५३ वनडे आणि ९६ टी२० सामने खेळले आहेत. वनडे सामन्यात त्याने २९.४२च्या सरासरीने ३६१९ धावा केल्या आहेत. ज्यात २ शतक आणि १८ अर्धशतकांचा समावेश आहे. यासह त्याने आपल्या मध्यमगती गोलंदाजीने ११४ विकेट्स देखील पटकावल्या आहेत. त्याचवेळी टी२० कारकिर्दीत त्याने २१.१६ च्या सरासरीने आणि १३५.९३ च्या स्ट्राईक रेटने १६७२ धावा काढल्या आहेत. तर १९.५५ च्या प्रभावित करणार्‍या सरासरीने गोलंदाजीत ५८ विकेट्स देखील घेतल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

पृथ्वी शॉच्या बेडवर मिळाली ही वस्तू; चाहत्यांनी केले जोरदार ट्रोल

WTC Final: कोहली अन् शास्त्रींची प्लेइंग इलेव्हनची निवड फसली? साउथम्पटनची खेळपट्टी करतेय इशारा

नादच खुळा! अश्विन- जडेजाची जोडी बनेल भारतीय संघासाठी ब्रह्मास्त्र, ३५ कसोटीत घेतल्यात ३६२ विकेट्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---