इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने नुकतेच वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यावरून इंग्लंडच्या माजी खेळाडूंनी त्यांची मते व्यक्त केली आहेत. त्यातील इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेनने आयसीसीला जबाबदार ठरवले होते. तर माजी फलंदाज केविन पीटरसननेही Ben त्याच्या निवृत्तीमागचे कारण करत इंग्लंड क्रिकेट बोर्डबाबत धक्कादायक विधान केले आहे.
बेन स्टोक्स (Ben Stokes) याने त्याच्या निर्णयाने सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे. चाहत्यांना आताही विश्वास बसत नाही की तो १९ जुलैला वनडे कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला आहे. त्याच्या या निर्णयामुळे केविन पीटरसन (Kevin Pietersen) याने इंग्लंड क्रिकेट बोर्डवर (इसीबी) ताशेरे ओढले आहेत. पीटरसनने ट्वीट करत ईसीबीवर हे धक्कादायक विधान केले आहे. त्याने ट्वीटमध्ये म्हटले, ‘मी जेव्हा व्यस्त वेळापत्रकाबद्दल तक्रार करत वनडेतून निवृत्ती घेतली होती तेव्हा ईसीबीने मला टी२० प्रकारात बंदी केली होती.’
https://twitter.com/KP24/status/1549367643265695744?s=20&t=sqxvcc2YJ2aS11ytHQSblQ
स्टोक्सने सोमवारी (१८ जुलै) वनडे क्रिकेटबाबत त्याचा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला होता. तो टी२० आणि कसोटी क्रिकेटमध्ये खेळणार आहे. त्याला कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करायचे आहे, असे कारण त्याने सांगितले आहे. तसेच तो भारताविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये परतला होता, मात्र या मालिकेत निराशाजनक कामगिरी झाल्याने त्याने या प्रकारातून निवृत्ती घेतली.
स्टोक्सला नुकतेच इंग्लंड कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार बनवले गेले. त्याच्या नेतृत्वाखाली संघ एक वेगळ्याच प्रकारचा खेळ करत आहे. तसेच इंग्लंडचे २०२३-२७च्या हंगामातील कसोटीचे वेळापत्रक व्यस्त आहे. त्यांना जवळपास ४२ कसोटी सामने खेळायचे आहेत.
स्टोक्सने २०११मध्ये वनडे क्रिकेटचा पदार्पणाचा सामना खेळला आहे. आयर्लंड विरुद्धच्या त्या सामन्यात त्याने ३ धावा केल्या होत्या. तर कारकिर्दीच्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ धावा केल्या. त्याने १०५ सामन्यांमध्ये फलंदाजीत ३८.९८च्या सरासरीने २९२४ धावा केल्या आहेत. यामध्ये ३ शतके आणि २१ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने ७४ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये ६१ धावांवर ५ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इशान किशनवर भडकला सूर्यकुमार यादव! पुढे जे झाले, ते पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
‘जलवा है हमारा!’ इंग्लंडविरुद्ध शतक झळकावणारा पंत आता ट्विटरवरही करतोय हवा
काय सांगता! आयपीएलच्या ‘या’ फ्रँचायझीने दक्षिण आफ्रिकेत विकत घेतलेत ६ टी२० संघ






