इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार केविन पीटरसन हा सोशल मीडियावर जास्त सक्रिय असतो. विशेष म्हणजे, भारत देश किंवा क्रिकेट संघाशी संबंधित कोणत्याही गोष्टीवर तो व्यक्त होताना दिसतो. नुकतीच कोविड-१९ विरोधात लढा देण्यासाठी भारत इतर देशांना सहकार्य करत असल्याने ट्विटद्वारे त्याने भारत सरकारची प्रशंसा केली होती. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.
झाले असे की, भारताचे परराष्टमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी काही दिवसांपुर्वी ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमध्ये कोरोना लसीचे साहित्य विमानात ठेवले असल्याचे दिसत होते. या फोटोला कॅप्शन देत जयशंकर यांनी लिहिले होते की, ‘भारतात बनवलेली कोरोना लस दक्षिण आफ्रिकातील जोहान्सबर्ग शहरात पोहोचवण्यात आली आहे.’
जयशंकर यांच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देत पीटरसनने लिहिले होते की, ‘भारताचे औदार्य आणि दयाळूपणा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सर्वांचा आवडता देश!’
पीटरसनच्या या ट्विटची भारताचे पंतप्रधान मोदी यांनी तोंडभरून प्रशंसा केली आहे. त्यांनी पीटरसनच्या ट्विटला प्रत्युत्तर देत लिहिले आहे की, ‘भारताप्रती तुझे असलेले प्रेम पाहून खूप चांगले वाटले. आम्ही पूर्ण जगाला आमचे कुटुंब समजतो आणि कोविड-१९ विरुद्ध आम्हाला आमची भूमिका व्यवस्थितरित्या पार पाडायची आहे.’
https://twitter.com/KP24/status/1356527995394142208?s=20
Glad to see your affection towards India. 🙂
We believe that the world is our family and want to play our role in strengthening the fight against COVID-19. https://t.co/zwpB3CNxLG
— Narendra Modi (@narendramodi) February 3, 2021
केविन पीटरसनची क्रिकेट कारकिर्द
पीटरसनने २००५ ते २०१३ या कालावधीत इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. यादरम्यान त्याने १३६ वनडे सामने खेळले असून ४४४० धावा केल्या आहेत. तसेच १०४ कसोटी सामन्यात ८१८१ धावा केल्या आहेत. याबरोबरच टी२० क्रिकेटमध्ये ३७ सामन्यात ११७६ धावांची नोंद केली आहे. तसेच पीटरसन हा जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि डेक्कन चार्जर्स संघाचा भाग होता. आयपीएलमध्ये त्याने एकूण ३६ सामने खेळले असून १००१ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
व्वा रे व्वा! दुखापतीमुळे चेन्नई कसोटीतून बाहेर असलेल्या शमीने गुंतवले व्यवसायात मन, पाहा फोटो
‘छम्मा छम्मा’ गाण्यावर धरला युझवेंद्र चहलच्या बायकोने ठेका, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
भारतीय क्रिकेटपटूंना ‘धोबी का कुत्ता’ संबोधणाऱ्या कंगनावर ट्विटरची कारवाई