भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी गेल्या वर्षीपासून क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएल २०२०मध्ये त्याला खेळताना पाहण्याची चाहत्यांकडे संधी होती. मात्र, कोविड-१९मुळे आयपीएलचा १३वा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याने तेही अशक्य झाले आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना या गोष्टीची चिंता वाटत आहे की, इथून पुढे धोनीला क्रिकेट खेळताना पाहायला मिळेल का नाही?
मात्र, इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनचे म्हणणे आहे की, “क्रिकेटजगतात अनेक नव्या गोष्टी पाहायला मिळू शकतात. त्याबरोबरच चाहत्यांना त्यांच्या आवडत्या अनेक खेळाडूंना अधिक काळ खेळतानाही पाहायला मिळू शकते. कोविड-१९मुळे खेळाडूंना मिळालेल्या ब्रेकच्या कारणाने काही खेळाडूंची कारकिर्द वाढू शकते.”
पीटरसनने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्वीट करत लिहिले की, “मला वाटते या अचानक मिळालेल्या ब्रेकमुळे कित्येक महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंची कारकिर्द वाढली आहे. सतत खेळाच्या दबावापासून काही वेळ सुटका मिळाल्यामुळे खेळाडूंना परत क्रिकेटवर अजून जास्त प्रेम होईल आणि अशा मनस्थितीत त्यांना खेळताना पाहणे रोमांचक असेल.” Kevin Pietersen Says That Most Of The Cricketers Can Play For India More
https://twitter.com/KP24/status/1264833486717845506
यावरुन दिसून येते की, धोनी परत भारताकडून क्रिकेट खेळण्याची शक्यता असू असते. शिवाय पीटरसनचे म्हणणे पूर्णपणे खरे ठरले, तर धोनीचीही क्रिकेट कारकिर्द अपेक्षेपेक्षा थोडी मोठी असण्याची शक्यता असू शकते.
ट्रेंडिंग घडामोडी-
क्रिकेटपटूंनी अनुष्काला पाठवले फोटो; विराट म्हणतो, तुम्ही असे काम करून…
क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! जूलैमध्ये होऊ शकते ही कसोटी मालिका
या गोष्टीमुळे ट्रोल होतेय भारतीय महिला, गेल्यावर्षी केले होते…