टी२० विश्वचषक २०२१ चे जेतेपद ऑस्ट्रेलिया संघाने जिंकले आहे. त्यानंतर आता इंग्लंड संघाचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू केविन पीटरसनने त्याची प्लेइंग इलेव्हन तयार केली आहे. पीटरसनने या प्लेइंग इलेव्हनमध्ये टी२० विश्वचषकात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या ११ खेळाडूंना सामिल केले आहे. त्याने या संघात दोन यष्टीरक्षक फलंदाजांना सलामीवीराच्या रूपात घेतले आहे. विशेष गोष्ट ही आहे की, पीटरसनच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही.
पीटरसनने सलामीवीराच्या रूपात इंग्लंडच्या जोस बटलर आणि पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला सामील केले आहे. पीटरसनच्या मते रिझवान पाकिस्तान संघासाठी सतत धावा करत आहे आणि उपांत्य सामन्यात त्याने आजारी असतानाही चांगले प्रदर्शन केले.
पीटरसन एका मुलाखतीत बोलताना म्हटला की, रिझवान पाकिस्तानच्या लाइन अपचा सतत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे, ज्याने आजारपणाशी लढा देऊन अप्रतिम प्रदर्शन केले आणि उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध ६७ धावा केल्या. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पीटरसनने त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तिसऱ्या क्रमांकावर निवडले आहे. तसेच चरिथ असलंका आणि एडेन मार्करम यांना पहिल्या पाचमध्ये सामील केले आहे. त्याने संघात दोन अष्टपैलूंना सामील केले होते, ज्यामध्ये मोईन अली आणि वानिंदू हसरंगा यांचा समावेश आहे.
या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार गोलंदाजांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज ऍडम झम्पाचे विश्वचषकाती प्रदर्शन पाहून पीटरसनने त्याला संघात सामील केले आहे. तो म्हणाला, मधल्या षटकांमध्ये झम्पाची विकेट घण्याची क्षमता, ऑस्ट्रेलियाने स्पर्धेचे जेतेपद मिळवण्यामागच्या प्रमुख कारणापैकी एक होती. त्याने संघात शेवटच्या तीन स्थानांवर न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट, पाकिस्तानचा शाहीन शाह अफ्रिदी आणि दक्षिण अफ्रिकेचा एन्रिक नॉर्किए यांना संधी दिली आहे. यामध्ये एकाही भारतीय संघातील खेळाडूला त्याने संधी दिलेली नाही.
पीटरसनने निवडलेली विश्वचषक प्लेइंग इलेव्हन – मोहम्मद रिझवान, जोस बटलर, बाबर आझम, चरिथ असलंका, एडेन मार्कराम, मोइन अली, वनिंदू हसरंगा, ऍडम जम्पा, ट्रेंट बोल्ट, एन्रिक नॉर्किए, शाहीन शाह आफ्रीदी.