इंग्लंडचे दिग्गज फलंदाज अॅलिस्टर कूक आणि केविन पीटरसन यांच्यात मागील काही वर्षांपासून संघर्ष आहे. पण आता हे वाद बाजूला ठेऊन केविन पीटरसनने शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या अॅलिस्टर कूकसाठी खास ट्विट केला आहे.
कूकने भारताविरुद्ध झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यानंतर कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. या सामन्यात त्याने शतक केले आहे. त्याबद्दल ट्विट करताना पीटरसनने कूकचे कौतुक केले असून तो यासाठी पात्र आहे असे म्हटले आहे.
https://twitter.com/KP24/status/1039169891117555714
त्याचबरोबर याआधीही काही दिवसांपूर्वी ट्विट करत पीटरसनने कूकला निवृत्तीबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. यात त्याने इंग्लंडचे कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीचा फोटो शेअर केला होता.
तसेच या ट्विटमध्ये म्हटले होते की “हे मोठे आकडे आहेत पण त्याचा(कूक) फलंदाजी करताना असलेली कणखर मानसिकता हा मोठा आणि चांगला गुणधर्म आहे.”
https://twitter.com/KP24/status/1036638925639569415
त्याचबरोबर मागच्या आठवड्यात कूकने कबूल केले होते की त्या दोघांनीही 2013-14 मध्ये झालेल्या वादानंतर संवाद साधलेला नाही. याबरोबरच कूक म्हणाला होता की हा खूप कठीण काळ होता. ज्याचा त्याच्या फलंदाजीवरही परिणाम झाला.
तसेच कूक म्हणाला की ‘जेव्हा अँड्र्यू स्ट्रॉसने सांगितले होते की आता पीटरसन खेळणार नाही तेव्हा माझ्या खांद्यावर मोठे ओझे पडले होते.’
कूक पुढे म्हणाला, ‘मी पहिल्यांदा त्या निर्णयामध्ये सहभागी होतो. पण इंग्लंडचा कर्णधार सर्व निर्णय घेत नाही. पण मी म्हणालो होतो की केपी(पीटरसन) परत संघात येऊ शकतो.’
तसेच या दोघांमध्ये असलेल्या वादाबद्दल कूक म्हणाला की वेळ हे सर्वात चांगले औषध आहे. वेळ जसा जाईल तसे सर्व ठिक होइल.
कूक आणि पीटरसनमध्ये 2013-14 च्या अॅशेस मालिकेनंतर संबंध बिघडले होते. या मालिकेतच इंग्लंडला 0-5 असा पराभव पत्करावा लागला होता. तसेच या मालिकेत पीटरसनला 294 धावाच करता आल्या होत्या.
तसेच त्याआधी भारताविरुद्ध झालेल्या 2012-13 मधील कसोटी मालिकेत पीटरसनने उत्तम कामगिरी केली होती. ही मालिका इंग्लंडने यजमान भारताला पराभूत करुन 2-1 अशी जिंकली होती. मात्र त्यानंतरही पीटरसन आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड यांच्यातील वाद चिघळले होते.
त्यामुळे त्याच्या बाबतील इंग्लंड आणि वेल्स क्रिकेटबोर्डाने त्याला वगळण्याचा निर्णय घेतला, ज्याला कूकने पाठिंबा दिला होता. या दरम्यान पीटरसन आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे वाद झाले होते.
यानंतर साधारण एक वर्षांने इंग्लंडचे माजी कर्णधार आणि त्यावेळचे इंग्लंड क्रिकेटबोर्डाचे अध्यक्ष अँड्र्यू स्ट्रॉसने पीटरसनचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संपले असल्याचे सांगितले. यासगळ्यामुळे कूक आणि पीटरसनमधील दरी वाढत गेली.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–पाचवी कसोटी: इंग्लंडने दिला अॅलिस्टर कूकला विजयी निरोप
–जेम्स अँडरसन बनला कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज
-२६ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताचा झाला असा पराभव; तर इंग्लंडने दिला अॅलिस्टर कूकला विजयी निरोप