---Advertisement---

“दिल्लीने विराटला आपल्या संघात घ्यावे”, दिग्गजाने घातली भावनिक साद

On: रविवार, मे 7, 2023 1:08 PM
---Advertisement---

आयपीएलच्या 16व्या हंगामात शनिवारी (6 मे) दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिल्स यांच्यात खेळला गेला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्लीने 7 विकेट्सने विजयश्री मिळवली. मात्र या सामन्या दरम्यान इंग्लंडचा माजी कर्णधार व सध्या समालोचक म्हणून आपली भूमिका पार पाडत असलेल्या केविन पीटरसन याने एक वेगळीच मागणी केली.

आरसीबीचा माजी कर्णधार व वरिष्ठ फलंदाज विराट कोहली या सामन्यात आपल्या घरच्या मैदानावर म्हणजे दिल्ली येथे खेळत होता. विराटने आपल्या क्रिकेटचे धडे पूर्वाश्रमीच्या फिरोजशहा कोटला म्हणजेच आत्ताच्या अरुण जेटली स्टेडियमवर गिरवले होते. या सामन्यासाठी विराट कोहलीच्या संपूर्ण कुटुंब तसेच बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा हे देखील स्टेडियममध्ये उपस्थित झालेले. सामना सुरू होण्याआधी सराव करत असताना विराटला आपले प्रशिक्षक शर्मा हे मैदानावर असल्याचे दिसले. तो त्यांच्यापाशी जाऊन त्यांच्या पाया पडला. विराटची ही कृती पीटरसन याला खूप भावली. एक ट्विट करत लिहिले,

https://twitter.com/KP24/status/1654853823276392448?t=bR3z8NvZ5MqexfYHE-EVHg&s=19

 

‘विराट त्याच्या लहानपणीच्या प्रशिक्षकांना अशाप्रकारे हॅलो करत आहे हे चित्र खूप छान वाटते. माझ्या मनात असा विचार येत आहे की, दिल्लीने त्याला आपल्या संघात सामील करून घ्यावे. मोठे ट्रान्सफर करत त्याला आपल्या घरच्या मैदानावर खेळण्याची संधी पुढच्या हंगामात द्यावी. फुटबॉलमध्ये मेस्सी, रोनाल्डो बेकहँम यांनी आपली कारकीर्द पुढे नेली. तुम्हाला काय वाटते?’

आपल्या घरच्या मैदानावर विराटने चांगली कामगिरी केली. 45 , चेंडूवर त्याने 54 धावा केल्या. मात्र ,‌‌त्यानंतरही आरसीबीला या सामन्यात पराभूत व्हावे लागले.

(Kevin Pietersen Suggest Virat Will Play For Delhi Capitals In Next IPL Season)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-
दिल मिल गये! गांगुली-विराटने सामन्यानंतर केला हॅंडशेक, वादावर पडला पडदा 
पथिरानाची कारकीर्द वाढवण्यासाठी धोनीने उचलले पाऊल! श्रीलंका क्रिकेट बोर्डाला केली ही विनंती 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---