इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगाम शुक्रवारी (22 मार्च) चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला गेला. सीएसकेने हा सामना 6 विकेट्सने जिंकला. चेन्नईच्या चॅपॉकवर या सामन्यासाठी चाहत्यांना मोठ्या संख्येने हजेरी लावली. ओपनिंग सरेमनीमुळे चाहत्यांचे पैसा वसून मनोरंजन देखील झाले. हाच उत्साह पाहून माजी इंग्लिश क्रिकेटपटू केविन पीटरसन याने जगभरातील क्रीडाप्रेमींना खास अपील केली आहे.
क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशांपैकी ऑस्ट्रेलिया हा सर्वात यशस्वी संघ मानला जातो. कारण ऑस्ट्रेलियाने आयसीसी विश्वचषकात सर्वाधिक सहा वेळा विजेतेपद पटकावले आहे. असे असले तरी, चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रेमाच्या बाबतीत भारतीय संघ सर्वात पुढे आहे. आयपीएल 2024 हंगामाच्या पहिल्याच सामन्यातीत प्रेक्षकांचा उत्साह पाहून केवीन पीटरसन (Kevin Pietersen) देखील हैराण राहिला. या सामन्यानंतर पीटरसनने जगभारतील चाहत्यांना भारतात येऊन क्रिकेट सामन्याचा आनंद घेण्याचा सल्लाच दिला आहे.
पीटरसनने आपल्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्वीटर) खात्यावरून पोस्ट केली की, “काल रात्री भारतात आणखी एकदा क्रिकेटच्या मैदानात अगदी अवास्तव वाटणारा अनुभव घेतला. मी भारताला भेट न देणाऱ्या प्रत्येक क्रीडा चाहत्यांना याठिकाणी येण्यासाठी प्रोत्साहन देऊ इच्छितो. शक्य तितक्या लवकर भारत दौरा करा! क्रीडा जगतातील सर्वोत्तम वातावरण इथे आहे, यात शंका नाही. तिकीट बूक करून लवकर भेट द्या!”
After experiencing another quite surreal atmosphere at a cricket ground in India again last night, I encourage EVERY SINGLE sports fan who hasn’t visited India and watched an @IPL game, to do it asap!
It’s without doubt the greatest atmosphere in global sport!Book the trip &…
— Kevin Pietersen🦏 (@KP24) March 23, 2024
दरम्यान, पीटरसन मागच्या काही वर्षांमध्ये समालोचकाच्या भूमिकेत दिसला आहे. इंग्लंडसाठी त्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, डेक्कन चार्जर्स, दिल्ली डेअरडेविल्स, रायजिंक पुणे सुपरजायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचे प्रतिनिधित्व केले आहे. (Kevin Pietersen’s advice to fans around the world to tour India)
महत्वाच्या बातम्या –
रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्जचा दिल्ली कॅपिटल्सवर 4 विकेट्सने विजय
KKR समोर हैदराबादचं आव्हान! पॅट कमिंसने जिंकला टॉस, घेतला ‘हा’ निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11