आज (११ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद संघात आयपीएल २०२०चा २६वा सामना झाला. या सामन्यातून राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने आयपीएलमध्ये पुनरागमन केले. त्यामुळे गेल्या २ वर्षांपासून राजस्थानकडून २३ सामने खेळत ३२४ धावांची प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या स्टोक्सवर सर्वांचे लक्ष लागले होते. पण हा धुरंधर डावातील दूसऱ्या षटकातच बाद झाला.
हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली आणि २० षटकात ४ विकेट्स गमावत १५८ धावा केल्या. त्यांचे हे आव्हान पूर्ण करण्यासाठी राजस्थानचा कर्णधार स्मिथने स्टोक्स आणि यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरला सलामीला फलंदाजीसाठी पाठवले. स्टोक्सनेही पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर जोरदार चौकार मारत दणक्यात सुरुवात केली.
पण दूसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या खलील अहमदने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. अहमदने १३७.६ किमी दर ताशी वेगाने चेंडू टाकला. स्टोक्सने तो चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू जाऊन थेट मागे यष्टीला लागला. त्यामुळे स्टोक्स आयपीएल २०२०च्या पहिल्याच सामन्यात ५ धावांवर त्रिफळाचीत झाला.
याव्यतिरिक्त स्टोक्सने हैदराबादची फलंदाजी चालू असताना गोलंदाजीदेखील केली. १ षटक टाकत त्याने ७ धावा दिल्या. दरम्यान त्याला एकही विकेट घेता आली नाही.
That's a short stay at the crease for Ben Stokes.
Khaleel Ahmed picks his first.
Live – https://t.co/uaylR8mH7g #Dream11IPL pic.twitter.com/UOPjEyaySO
— IndianPremierLeague (@IPL) October 11, 2020
@GodrejAppliance #NowIsWow Wicket of Stokes
Ben Stokes gone. Drags on to his stumps. Khaleel with the wicket. RR one down.
RR 7/1 after 1.2 overs pic.twitter.com/zifZSUSH8r
— karan (@karan11177) October 11, 2020
आपल्या कॅन्सरग्रस्त वडीलांसाठी स्टोक्स मागील काही दिवस न्यूझीलंडमध्ये होता. त्यामुळे तो आयपीएल २०२० साठी उशीरा राजस्थान संघात दाखल झाला. याच कारणाने तो सुरुवातीचे काही सामने खेळला नव्हता. मात्र काही दिवसांपुर्वीच आयपीएल २०२० साठी तो युएईला आला होता आणि बीसीसीआय प्रोटोकॉलनुसार ६ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर हैदाराबादविरुद्धच्या सामन्यातून त्याने आयपीएलमध्ये पुनरागमन केले.
महत्त्वाच्या बातम्या-
“माझी तुलना तीही रोहित शर्माशी…”, युवा पाकिस्तानी क्रिकेटरने केले मोठे वक्तव्य
‘निशब्द’ झाला पंजाब संघ; कोलकाता विरुद्धच्या पराभवानंतरचे ‘हे’ ट्विट होतंय व्हायरल
विराटने धोनीची घेतलेली गळाभेट पाहून चाहत्यांनाही झाला आनंद, पाहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख-
‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज
आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ
वाढदिवस विशेष.! क्रिकेटवर मनापासून प्रेम करणारा दर्दी ‘महानायक’